दातांमधील कीड आणि सडण्यापासून थांबविण्यासाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)
जर दातांमधील कॅव्हिटी ही सुरुवातीच्या किंवा मध्यवर्ती टप्प्यात असेल तर त्यावर नैसर्गिकरित्या उपचार करता येतात. जर दातांची पोकळी खूप खोलवर असेल तर काही भाग पूर्णपणे बरे होऊ शकत नाहीत, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये, पुन्हा चांगले दात करणे हे शक्य आहे, असे प्रसिद्ध अमेरिकन डॉक्टर अॅक्स यांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांच्या मते, रासायनिक उपचारांशिवाय Cavity बरी होऊ शकते. डॉक्टरांनी नैसर्गिकरित्या दातांच्या कीड असण्यावर उपचार करण्याचे काही मार्गदेखील सुचवले आहेत. कोणते आहेत हे उपाय आपण जाणून घेऊया.
अनहेल्दी धान्य आणि अतिरिक्त साखर
अतिरिक्त साखर खाणे टाळा
तुमच्या आहारातून जास्तीचे अनहेल्दी असणारे धान्य आणि प्रक्रिया केलेली साखर काढून टाका. धान्यांमधील फायटिक Acid शरीराला कॅल्शियम, लोह आणि खनिजे शोषण्यापासून रोखते. तसंच अतिरिक्त साखर तुम्हाला वेगवेगळ्या आजाराला निमंत्रण देण्यास भाग पाडते. याशिवाय दातांवर साखरेचा परिणाम लवकर होतो आणि कॅव्हिटीचा त्रास अधिक वाढू शकतो. त्यामुळे आपल्या आहारातून याचा वापर काढून टाकावा
गोड खाऊन सडलेत दात, लागलीये कीड; फिलिंगशिवाय दातांची पोकळी भरतील 5 उपाय, मुळापासून निघेल दुर्गंधी पू
अंकुरित वा फर्मेंटेड धान्य
स्प्राऊट्स वा फर्मेंटेड पदार्थ खा
डॉक्टरांनी सल्ला दिला की जर तुम्ही धान्य खाल्ले तर फक्त अंकुरलेले किंवा आंबवलेले धान्य निवडा. या अशा अन्नामध्ये फायटिक अॅसिडचा समावेश नसतो, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वे शोषणे सोपे होते. नाश्त्यामध्ये अंकुरित धान्य खाण्याने फायबर अधिक प्रमाणात मिळते आणि दातदेखील मजबूत राहण्यास मदत मिळते. फर्मेंटेड पदार्थांमुळे दातांमध्ये कीड जमा होत नाही.
प्रोसेस्ड शुगर बंद करा
प्रोसेस्ड शुगर खाणे टाळा
प्रक्रिया केलेली साखर अर्थात प्रोसेस्ड शुगर दातांसाठी सर्वात हानिकारक आहे, कारण ती तोंडात बॅक्टेरियाची वाढ वाढवते, ज्यामुळे पोकळी निर्माण होते. कच्चा मध दातांसाठी सुरक्षित आहे. ब्लूबेरी, रास्पबेरी आणि सफरचंद यांसारखी फळे कमी प्रमाणात खाणेदेखील दातांसाठी फायदेशीर आहे.
आवश्यक विटामिन्स आणि मिनरल्स
मजबूत आणि निरोगी दातांसाठी व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आवश्यक आहेत. हे पोषक घटक तुम्हाला शेळीच्या कच्च्या दुधापासून किंवा शेळीच्या दुधाच्या आंबवलेल्या दह्यामधून मिळू शकतात. याचा तुम्ही आपल्या आहारामध्ये समावेश करून घेतल्यास फायदा मिळू शकतो.
प्रोबायोटिक्स खावे
प्रोबायोटिक्स हे चांगले बॅक्टेरिया आहेत जे तोंडातील वाईट बॅक्टेरिया मारतात. तुमच्या आहारात दही, केफिर, सॉकरक्रॉट, किमची आणि सफरचंद सायडर व्हिनेगर सारखे आंबवलेले पदार्थ समाविष्ट करा. याचा आपल्या आहारातील समावेश दातांचा काळजी घेण्यास उपयुक्त ठरतो. दातांमध्ये जास्त प्रमाणात कॅव्हिटी होत नाही.
डॉ. डोश एक्सचा व्हिडिओ
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.