कोणता तांदूळ खाणे आहे बेस्ट? सद्गुरू जग्गी वासुदेवांचा मोलाचा सल्ला
तांदूळ हे भारतात सर्वात जास्त वापरले जाणारे अन्न आहे. तांदळाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि प्रत्येकाची चव आणि फायदे वेगळे आहेत. अशा वेळी अनेक वेळा प्रश्न पडतो की कोणता तांदूळ चांगला आहे किंवा कोणता तांदूळ आरोग्यासाठी चांगला आहे? भारतातील विविध राज्यात विविध प्रकारचे तांदूळ आढळतात. तांदूळ तयार करणे सोपे आहे, तांदूळ हा कार्बोहायड्रेट्सचा एक उत्तम स्रोत आहे, जो शरीराला त्वरीत ऊर्जा प्रदान करतो. याशिवाय भातामध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात.
ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी उत्तम तांदूळ कोणता याबाबत सांगितले आहे. त्यांनी काळ्या कवुनी तांदूळाचे त्यांनी उत्तम वर्णन केले आहे. मुळात तामिळनाडूमध्ये लागवड केलेल्या काळ्या तांदळाचा हा एक प्रकार आहे. हा अनोखा तांदूळ भरपूर पोषक आहे आणि तो खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात, कसे ते जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock/Instagram)
ब्लॅक तांदळातील पोषक तत्व
काळ्या तांदळात कोणते पोषक तत्व आहेत
सद्गुरूंनी काळ्या तांदळाचे वर्णन ‘काळी जादू’ म्हणून केले आहे कारण त्यात शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात. ते खाल्ल्याने प्रथिने, लोह आणि फायबरसारखे पोषक घटक मिळतात. यामुळे शरीराला विविध फायदे मिळतात असंही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आपल्या आहारात या ब्लॅक राईसचा समावेश करून घ्यावा.
कावुनी तांदळाचे गुण
ब्लॅक तांदळातील गुण आहेत महत्त्वाचे
कावुनी तांदळात आढळणारे अँटीऑक्सिडंट्स, अँथोसायनिन्स आणि फायबर एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून रक्त प्रवाह सुधारतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. याच्या सेवनाने कोरोनरी आर्टरी डिसीजपासून बचाव होतो. हे तांदूळ तामिळनाडू राज्यात जास्त मिळतात. मात्र संपूर्ण देशात त्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे तुम्हीही त्याचा उपयोग करून घ्यावा.
कॅन्सर टाळण्यासाठी
कॅन्सरचा आजार दूर ठेवण्यासाठी
अँथोसायनिन्स नावाचे घटक काळ्या तांदळात अधिक प्रमाणात आढळतात, जे शरीरातील सूज कमी करण्यास आणि दाहक विकारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. याच्या नियमित सेवनाने कर्करोग, विशेषतः स्तनाचा कर्करोग टाळता येतो असेही त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. त्यामुळे कर्करोगापासून दूर राहायचे असेल तर आहारात याचा समावेश करून घ्यावा.
अँटीऑक्सिडंट्सयुक्त
काळ्या कावुनी तांदळात अँथोसायनिन्सचे प्रमाण जास्त असते, त्याचा गडद रंग हा अँटीऑक्सिडंटमुळेच आलेला आहे. या कावुनी तांदळात 23 प्रकारचे अँटीऑक्सिडंट आढळतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात आणि कर्करोग, हृदयविकार आणि वय संबंधित समस्यांसारख्या जुनाट आजारांचा धोका कमी करतात.
हेदेखील वाचा – काळा तांदूळ कधी खाल्ला आहे का? जाणून घ्या काळ्या तांदळाचे आश्चर्यकारक फायदे
वजन आणेल नियंत्रणात
वजन नियंत्रणात आणण्यासाठी ब्लॅक राईस
फायबरच्या चांगल्या प्रमाणामुळे काळा तांदूळ उत्तम ठरतो आणि भूक नियंत्रित करण्यास मदत करतो, जे वजन नियंत्रणासाठी फायदेशीर आहे. त्यात असलेल्या फायबरमुळे, ते नियमित आतड्यांसंबंधी हालचालींना प्रोत्साहन देते, बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते आणि आतड्यांसंबंधी आरोग्यास प्रोत्साहन देते. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि तुमचे वजन झर्रकन वाढत नाही आणि नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
हिमोग्लोबिनसाठी वरदान
काळ्या कावुनी तांदळात भरपूर लोह असते, जे हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आणि अशक्तपणा टाळण्यासाठी आवश्यक आहे, विशेषत: लोहाच्या कमतरतेने ग्रस्त असलेल्यांसाठी याचा अधिक उपयोग होतो. ब्लॅक तांदळाच्या सेवनाने मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
हेदेखील वाचा – काळा, पांढरा किंवा लाल तांदूळ जाणून घ्या आरोग्यासाठी कोणता सर्वात फायदेशीर
सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा सल्ला