अभिनेत्री प्रियंका चोप्रा मेकअप रिमूव्हरसाठी 'या' खास तेलाचा करते वापर
सर्वच महिला सुंदर दिसण्यासाठी मेकअप करतात. लग्न समारंभ, सणवार, ऑफिस इत्यादी ठिकाणी जाताना नेहमीच मेकअप केला जातो. मेकअप करताना वेगवेगळे प्रॉडक्ट वापरले जातात. याशिवाय त्वचेच्या रंगला सूट होईल असे फाऊंडेशन, आयशॅडो, लिपस्टिक इत्यादी अनेक प्रॉडक्टचा वापर करून मेकअप केला जातो. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे मेकअप प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही अतिशय स्वस्तले किंवा महागडे प्रॉडक्ट वापरून मेकअप करू शकता. मेकअप केल्यानंतर महिलांच्या सौदंर्यात आणखीनच वाढ होते. त्वचेवर वेगवेगळे मेकअप प्रॉडक्ट लावल्यानंतर बऱ्याच काही महिला मेकअप संपूर्ण दिवसभर त्वचेवर तसाच ठेवून देतात. यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
हाता-पायांवरील काळवटपणा दूर करेल Bubble Mask; वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
चेहऱ्याला सूट होईल असा मेकअप केल्यानंतर त्वचा व्यवस्थित स्वच्छ करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. चेहऱ्यावर जास्त काळ मेकअप तसाच राहिल्यामुळे त्वचा अतिशय निस्तेज वाटू लागते. मेकअप केल्यानंतर तो काढून टाकण्यासाठी बाजारात अनेक तेल किंवा मेकअप रिमूव्हवर प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. प्रामुख्याने महिला मेकअप काढण्यासाठी क्लींजिंग बाम किंवा मायसेलर वॉटरचा वापर करतात. पण अभिनेत्री प्रियांका चोप्रा मेकअप काढण्यासाठी तेलाचा वापर करते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री प्रियांका चोप्रा मेकअप रिमूव्ह करण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर करते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
संपूर्ण चेहऱ्यावर मेकअप केल्यानंतर तो काढण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर करावा. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेचे नुकसान न करता चेहऱ्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. मेकअप काढताना हातांवर थोडेसे नारळाचे तेल घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर घासून हलक्या हाताने मसाज करा. हलक्या हाताने मसाज केल्यानंतर मेकअप पूर्णपणे निघून येईल. त्यानंतर कॉटनच्या कपड्याने मेकअप पुसून काढा. त्यानंतर फेसवॉश करून चेहरा स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
चेहऱ्यावर केलेला मेकअप काढताना घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचेचे कोणतेही नुकसान होणार नाही. नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेल्या नारळाच्या तेलात अनेक घटक आढळून येतात. याशिवाय तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करूनसुद्धा मेकअप रिमूव्ह करू शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केलेला मेकअप काढण्यासाठी काकडीच्या रसाचा वापर करावा. या रसाचा वापर केल्यामुले मेकअप निघून त्वचा अतिशय सुंदर आणि हायड्रेट राहील.