चमत्कारी आहे या मंदिरांचा दगड
भारतात अनेक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय अशी धार्मिक स्थळे आहेत. हिंदू धर्मात, या ठिकाणांना फार महत्त्व देण्यात आले आहे. अशात या ठिकाणी नेहमीच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणाची आपली अशी वेगळी ओळख आणि खासियत असते ज्यासाठी ते प्रसिद्ध असते. अशात आज आम्ही तुम्हाला कर्नाटकातील एका मंदिराविषयी माहिती सांगत जे १२ व्या शतकात बांधले गेले होते. या मंदिराला धार्मिक-ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अमरगिरी श्री गुड्डाडा रंगनाथस्वामी मंदिर असे त्याचे नाव असून हे मंदिर हसन जिल्ह्यातील चन्नरायापेटा तालुक्यातील चिक्कोनहल्ली येथे वसले आहे. तामिळनाडूतून निर्वासित झाल्यानंतर मेलुकोटे येथे आलेले श्री रामानुजाचार्य त्यांच्या प्रवासादरम्यान चिक्कोनहल्ली येथे राहिले असल्याचे सांगितले जाते.\
इंग्रजांच्या काळापासून फेव्हरेट आहे भारतातील हे ठिकाण; फिरण्यासाठीचे उत्तम ठिकाण
त्या रात्री रामानुजाचार्य यांना एक विशेष आध्यात्मिक अनुभव आला. दुसऱ्या दिवशी त्याने गावकऱ्यांना सांगितले की, हे ठिकाण भगवान विष्णूंना पवित्र आहे. त्यांनी सांगितले की, येथे भगवान विष्णूची मूर्ती स्थापित केल्यानंतर त्यांची दररोज पूजा करावी. त्यांच्या सूचनांनुसार, गावकऱ्यांनी धनुष्यबाण धरलेल्या भगवान रामाची मूर्ती स्थापित केली आणि नियमित पूजा सुरू केली. मंदिराची कथा तर रंजक आहेच शिवाय इथे असलेले एक दगड देखील कोणत्या रहस्याहुन कमी नाही. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
मंदिरात कसे जावे?
हे मंदिर कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील चन्नरायपटना तालुक्यातील चिक्कोनहल्ली गावात आहे. येथे पोहोचण्यासाठी, प्रथम तुम्हाला हसन किंवा चन्नरायपटना येथे पोहोचावे लागेल, जे रस्ते आणि रेल्वेने चांगले जोडलेले आहे. जर तुम्ही बंगळुरूहून येत असाल तर तुम्हाला सुमारे १६० किमी अंतर कापावे लागेल, जे तुम्ही कार, बस किंवा ट्रेनने जाऊ शकता. इथे जाण्यासाठी ३-४ तासांचा वेळ लागेल. चन्नरायपटना किंवा हसन येथून तुम्ही टॅक्सी किंवा स्थानिक वाहनाने चिक्कोनहल्लीला पोहोचू शकता.
परकीय आक्रमणकर्त्यांपासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी, गावकऱ्यांनी त्याला रंगनाथस्वामी मंदिर म्हणायला सुरुवात केली, कारण येथे आक्रमक रंगनाथाचे नाव आणि पूजा आदराने करत असत. आज, रामानुजाचार्य यांनी सांगितल्याप्रमाणे, हे मंदिर रंगनाथस्वामी मंदिराच्या नावाने प्रसिद्ध आहे. दर शनिवारी समुदायासाठी दसोहा (जेवण) असतो. रामनवमीनिमित्त रथोत्सव साजरा केला जातो. पुजारी पार्थसारथी यांच्या मते, मंदिराचे रक्षण “दोनाप्पा” नावाच्या संरक्षक देवतेने केले आहे.
या मंदिरात एक दगड आहे ज्याला फार खास मानले जाते. वास्तविक, जेव्हा रामानुजाचार्य येथे आले होते तेव्हा त्यांनी उशी म्हणून या दगडाचा वापर केला होता. या दगडाबाबत अशी मान्यता आहे की, जो कोणी या दगडावर इच्छा घेऊन बसले तर जर इच्छा पूर्ण झाली नाही तर तो डावीकडे सरकतो आणि जर इच्छा पूर्ण झाली तर तो दगड उजवीकडे झुकत राहतो. आपल्या हलण्याच्या वेगाने हा दगड नेहमीच भाविकांना आश्चर्यचकित करत असतो.
Vat Savitri 2025: कुणी 500 तर कुणी 250 वर्षे जुना… हे आहेत भारतातील सर्वात प्राचीन वटवृक्ष
मंदिराबाबत महत्त्वाच्या गोष्टी
कर्नाटकातील अमरगिरी श्री गुड्डाडा रंगनाथस्वामी मंदिरात जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च दरम्यान आहे. या काळात हवामान थंड आणि आल्हाददायक राहते. विशेषतः रामनवमीनिमित्त येथे भव्य रथोत्सव साजरा केला जातो, जो पाहण्यासाठी भाविक दूरवरून येतात. याशिवाय, दर शनिवारी एक विशेष पूजा आणि सामुदायिक जेवण (दसोहा) असते. त्याचबरोबर पावसाळ्यात मात्र (जुलै ते सप्टेंबर) रस्ते निसरडे झाल्यामुळे येथे पोहोचणे थोडे कठीण होऊ शकते.