पावसाळ्यात अंघोळ केल्यानंतर चेहऱ्यावर लावा 'या' गोष्टी
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे थंडगार वातावरण झाले आहे. तसेच या दिवसांमध्ये आर्द्रता आणि घामामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागतात. सतत येणाऱ्या घामामुळे त्वचा तेलकट आणि चिकट होऊन जाते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर फिरून आल्यानंतर त्वचा अधिकच चिकट होते, ज्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा होण्यास सुरुवात होते. शरीर स्वच्छ करण्यासाठी नियमित अंघोळ केली जाते. अंघोळ केल्यामुळे शरीर आणि मन दोन्ही फ्रेश राहण्यास मदत होते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अंगाला सतत खाज येऊ लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अंघोळ केल्यानंतर चेहऱ्यावर आणि शरीरावर काय लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ लावल्यामुळे त्वचा अधिकच मऊ आणि मुलायम होईल.(फोटो सौजन्य – istock)
45 व्या वयातही दिसाल 25 सारखे तरणेबांड, आजच सुरू करा 5 कोरियन ड्रिंक्स; सगळे विचारतील रहस्य
त्वचेची काळजी घेण्यासाठी त्वचेवर नियमित कोरफड जेल लावावे. कोरफड जेल शरीरावरील त्वचा कायमच हायड्रेट आणि निरोगी करते. कोरफड जेल अंघोळ करण्याआधी संपूर्ण शरीरावर लावून घ्या. त्यानंतर १५ मिनिटं ठेवून पाण्याने स्वच्छ अंघोळ करा. नियमित आठवडाभर कोरफड जेल शरीरावर लावल्यास त्वचा कायमच हायड्रेट आणि निरोगी राहील. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधरण्यास मदत होईल.
अंघोळ केल्यानंतर गुलाब पाणी टोनर म्हणून त्वचा आणि शरीरावर लावल्यास त्वचा कायमच हायड्रेट आणि निरोगी राहील. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. गुलाब पाण्यात असलेले गुणधर्म त्वचा हायड्रेट आणि कायम फ्रेश ठेवतात. त्वचेची पीएच लेव्हलही बॅलन्स करण्यासाठी अंघोळ केल्यानंतर गुलाब पाणी लावावे. गुलाब पाण्याचा स्प्रे त्वचेवर लावल्यास त्वचा दिवसभर फ्रेश राहील.
हल्ली सोशल मीडियावर कोरियन स्किन केअर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. स्किन केअरमध्ये कोरियन प्रॉडक्टचा वापर केला जात आहे. हे प्रॉडक्ट तांदळाच्या पाण्यापासून बनवले जातात. त्यामुळे सुंदर त्वचेसाठी घरातील तांदळाच्या पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. या पाण्याच्या वापरामुळे त्वचेचा रंग उजळदार होण्यास मदत होईल. तसेच त्वचा कायमच फ्रेश दिसू लागेल.
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी नियमित करा Ice Massage, आठवडाभरात त्वचेवर दिसून येईल फरक
अंघोळीच्या पाण्यात किंवा अंघोळ करण्याआधी संपूर्ण शरीरावर कच्चे दूध लावून काहीवेळा तसेच ठेवून घ्या. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करा. कच्च्या दुधाच्या वापरामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. याशिवाय उन्हामुळे वाढलेले टॅनिंग कमी होऊन त्वचा उजळदार दिसू लागेल. कच्चे दूध त्वचा हायड्रेट आणि मुलायम ठेवते.