घरात उंदरांनी थैमान घातला आहे? मग 'हे' घरगुती उपाय केल्यास उंदीर जातील कायमचे घराच्या बाहेर
प्रत्येक घराच्या आजूबाजूला, घरात, इतर सगळीकडे उंदीर नेहमीच फिरत असतात. काही लहान मुलं उंदीर पाहिल्यानंतर खूप जास्त घाबरतात. घरात आलेले उंदीर बाहेर घालवण्यासाठी सतत काहींना काही केले जाते. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या गोळ्या आणून घरात लावलेल्या जातात तर काही लोक घरात उंदीर पडकण्यासाठी पिंजरा लावतात. मात्र तरीसुद्धा घरातील उंदीर बाहेर पडून जात नाही. घरात उंदीर आल्यानंतर आरोग्यासंबंधित आणि त्वचेसंबंधीत समस्या उद्भवण्याची शक्यता असते. हे उंदीर आरोग्यासंबंधित विविध आजारांचे कारण बनतात. घरातील अन्नपदार्थ, कडधान्य, कपडे किंवा घरातील इतर सामानाची पूर्णपणे वाट लावून टाकतात. घरात आलेले उंदीर सगळीकडे अस्वच्छता निर्माण करतात.(फोटो सौजन्य – istock)
घरात कायमच उंदीरांचा त्रास सहन करणे अतिशय कठीण होऊन जाते. उंदीर चावल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरात आलेले कायमचे बाहेर काढून टाकण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास घरात आलेले उंदीर बाहेर पडून जातील आणि घर स्वच्छ होईल.
पुदिन्याच्या पानांचा वापर जेवणातील पदार्थांमध्ये केला जातो. याशिवाय आरोग्य आणि त्वचेच्या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याची पाने वापरली जातात. याशिवाय घरात आलेले उंदीर बाहेर घालवण्यासाठी तुम्ही पुदिन्याची पाने वापरू शकता. पुदिन्याच्या तेलाचा उग्र वास उंदरांना सहन होत नाही. यासाठी कापसाचा छोटासा तुकडा घेऊन त्यावर पुदिन्याचे तेल टाकून घरातील उंदरांच्या वाटेवर ठेवून घ्या. यामुळे घरात उंदीर येणार नाही. याशिवाय तुम्ही हे तेल घराच्या कोपऱ्यांमध्ये, उंदरांच्या येण्याच्या मार्गांवर आणि पॅन्ट्रीमध्ये ठेवू शकता.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना कांदा आणि लसूणचा वापर केला जातो. कांदा लसूणशिवाय पदार्थांची चव चांगली लागत नाही. घरात आलेले उंदीर घालवण्यासाठी उंदीर फिरतात त्या ठिकाणी कांदा किंवा लसूण कापून ठेवून द्या. तसेच कांदा आणि लसूणचे तयार केलेले पाणी घराच्या कोपऱ्यात, दरवाज्याच्या मागे शिंपडून ठेवा. यामुळे घरात उंदीर येणार नाहीत.
पोटात वाढलेल्या जंतामुळे त्रस्त आहात? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
स्प्रे बॉटलमध्ये लाल तिखट आणि पाणी मिक्स करून मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण उंदीर ज्या ठिकाणाहून आतमध्ये येतात किंवा बाहेर जातात, त्याठिकाणी मारून ठेवा. यामुळे उंदीर घरात येणार नाहीत. लाल मिरची पावडरच्या वासाने घरात उंदीर येत नाही. याशिवाय कॉफी पावडरचा सुगंध उंदरांना आवडत नाही . त्यामुळे घराच्या आजूबाजूला तुम्ही कॉफी पावडर टाकून ठेवू शकता.