कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी या आयुर्वेदिक वनस्पतींचे सेवन करा:
शरीरामध्ये खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्यामागे काही काही कारणसुद्धा आहेत. जीवनशैलीमध्ये सातत्याने होणारे बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप आणि सतत बाहेरील पदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढणे म्हणजे शरीरातील नसांमध्ये किंवा इतर अवयवांमध्ये अतिरिक्त चरबी वाढणे. ही खराब चरबी वाढल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. हळूहळू हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्यास सुरुवात होते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात एलडीएलची पातळी वाढणे हे शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी कोणत्या आयुर्वेदिक वनस्पतींचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: या समस्या असल्यास लिंबू पाणी पिणं पडू शकते महागात
मेथी दाण्यांचे सेवन:
शरीरात वाढलेली कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी आहारात मेथी दाण्यांचे सेवन करावे. यासाठी एक ग्लास पाण्यात मेथी दाणे भिजत ठेवून सकाळी उठल्यावर त्याचे पाणी प्यावे. तसेच पाण्यासोबत मेथी दाणे चावून खावेत. यामुळे शरीरात वाढलेली कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होईल. मेथी दाण्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.
चवीला तुरट असलेला आवळा अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. आवळ्याचे सेवन केल्यामुळे केस आणि त्वचेला फायदे होतातच पण आरोग्यासाठी सुद्धा आवळा गुणकारी आहे. आवळ्यामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळून येतात. ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी कमी होते. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात आवळ्याची पावडर टाकून हे पाणी प्यायास आरोग्य सुधारेल.
हे देखील वाचा: पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी प्या ‘हे’ पेय, चरबी होईल कमी
वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीलसूण अतिशय प्रभावी आहे. अनेक लोक लसूण तिखट असते म्हणून लसणीचे सेवन करत नाहीत पण असे न करता आहारात लसणीचा समावेश करावा. लसणूमध्ये आढळून येणारे एलिसिन शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल स्वच्छ करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी दोन लसूण खाऊन त्यावर गरम पाणी प्यावे. यामुळे शरीरातील नसांमध्ये चिटकून राहिलेले कोलेस्ट्रॉल स्वच्छ होईल.