भृंगराज तेलाचे महत्व
घनदाट आणि मजबूत केसांसाठी केसांना नियमित हेअर ऑइल लावले जाते. केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत केसांना तेल लावल्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. खोबरेल तेलव्यतिरिक्त बाजारात अनेक प्रकारचे तेल उपलब्ध आहेत. त्यातील मागील अनेक वर्षांपासून वापरले जाणारे भृंगराज तेल. या तेलाला आयुर्वेदामध्ये विशेष महत्व आहे. पूर्वीच्या काळापासून वापरले जाणारे तेल अजूनही अनेक स्त्रिया केसांना लावत आहेत. हे तेल लावल्याने केस गळती थांबून केसांची वाढ होण्यास मदत होते. केसांचे सौंदर्य व आरोग्य चांगले राहण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांमध्ये भृंगराज तेल वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बाजारामध्ये भृंगराज तेल सहज उपलब्ध होते.
केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी या तेलाचा वापर करावा. भृंगराज तेल वापरल्यामुळे केस गळती, केस पातळ होणे, केसांची वाढ खुंटणे यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. या तेलामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आढळून येतात, जे केसांच्या वाढीसाठी गुणकारी आहेत. केसांची मूळ मजबूत होण्यापासून ते केसांमधील चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी भृंगराज तेल मदत करते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला भृंगराज तेल कसे वापरावे? केसांच्या मुळांना भृंगराज तेल लावल्याने काय फायदे होतात, जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: शरीरातील iron ची कमतरता दूर करतात हे 5 ज्यूस
औषधी वनस्पतींमध्ये भृंगराज तेलाचा समावेश आहे. हे तेल केसांना लावल्यामुळे केसांना अनेक फायदे होतात. केसांच्या गंभीर समस्यांवर रामबाण उपाय म्हणून भृंगराज तेलाचा वापर केला जातो. या तेलामुळे हेअर ग्रोथ सायकल अॅक्टिव्ह होण्यास मदत होते. केस गळती थांबून पुन्हा नव्याने केस येण्यास सुरुवात होते. तसेच केसांना नैसर्गिक रंग मिळतो. भृंगराज तेल लावल्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात. यामुळे केसांमधील स्काल्प स्वच्छ राहतात. भृंगराज ही एक औषधी वनस्पती असून याच्या वापरामुळे कोणतेही दुष्परिणाम केसांवर दिसून येत नाही.
हे देखील वाचा: त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी मुलतानी माती लावताय मग थांबा! ‘या’ त्वचेचे होऊ शकते नुकसान






