वारंवार लघवी करताना जळजळ होते? दैनंदिन आहारात चुकूनही करू नका 'या' भाजीचे सेवन
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, मानसिक तणाव, अपुरी झोप किंवा बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. वाढत्या वयात शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लहान मुलांसह मोठ्यांना भेंडीची भाजी खायला खूप जास्त आवडते. भेंडीच्या भाजीपासून वेगवेगळे पदार्थ बनवून लहान मुलांना डब्यासाठी दिले जातात. वारंवार घरात भेंडीची भाजी बनवल्यानंतर भाजी खाण्याचा खूप जास्त कंटाळा येतो. मात्र लहान मुलांच्या आग्रहाखातर घरात भेंडीची भाजी बनवली जाते. भेंडीची भाजी आरोग्यासाठी जितकी चांगली आहे तितकीच वाईट सुद्धा आहे. त्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात भेंडीच्या भाजीचे सेवन करू नये.(फोटो सौजन्य – istock)
भेंडीच्या भाजीचे सेवन केल्यानंतर हळूहळू शरीराला हानी पोहचण्याची सुरुवात होते. तसेच किडनी स्टोन किंवा मधुमेहासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी भेंडीच्या भाजीचे अजिबात सेवन करू नये. कारण भेंडीच्या भाजीमधील बिया किडनी स्टोन असलेल्या लोकांसाठी घातक आहेत. यामुळे स्टोनचा आकार वाढून पोटात वेदना होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्याही लोकांनी आहारात भेंडीच्या भाजीचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
सावधान! प्रत्येकासाठी नाही केळं फायदेशीर, ‘या’ त्रासात असणाऱ्या रूग्णांनी चुकूनही नका करू सेवन
डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, अर्थरायटीसचा त्रास असलेल्या लोकांनी भेंडीची भाजी खाऊ नये. कारण यामध्ये असलेल्या ऑक्झालेटमुळे शरीरातील युरिक ॲसिड वाढण्याची जास्त शक्यता असते. तसेच जाॅईंट्सवर सूज येणे, संधिवात किंवा हाडांमध्ये वेदना वाढू लागतात. तसेच पोटासंबंधित समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात भेंडीची भाजी खाऊ नये. यामुळे ऍसिडिटी, गॅस किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागते. भेंडीची भाजी खाल्ल्यानंतर काहींना उलट्या किंवा मळमळ होते. भेंडीच्या भाजीमध्ये असलेले घटकांमुळे काहींना लघवीसंबंधित समस्या उद्भवतात.भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे काही लोकांना पोट फुगणे, गॅस आणि अपचन होऊ शकते. भेंडीच्या भाजीमध्ये असलेल्या ऑक्सलेटमुळे गाउटची समस्या वाढते.