(फोटो सौजन्य – istock)
कॅल्शियम मांसपेशींचे संकुचन होण्यात महत्वाची भूमिका बजावतो. कॅल्शियममुळे रक्ताच्या गुठळ्याही तयार होत नाहीत. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात याव्यतिरिक्त नखांमध्येही लक्षणं दिसून येतात. शरीरातील काही लक्षणे कॅल्शियमच्या कमतरतेचे संकेत देत असतात. चला ही कोणती लक्षणे आहेत आणि शरीरातील ही कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे ते जाणून घेऊया.
कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे कोणती ?
वॉशिग्टन नॅशनल हेल्थ सर्विसच्या रिपोर्टनुसार कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक लक्षणं दिसून येतात जसं की कंबरेत वेदना, मांसपेशी कुमकुवत होणं, दातांमध्ये वेदना, चिंताग्रस्तता हिरड्यांच्या समस्या, नखं पातळ होणं कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीराला थकवा येतो. जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता भासते तेव्हा नखं पातळ होतात आणि तुटू लागतात. हाडांतून कॅल्शियम कमी होणे याला ऑस्टिओपेनिया असं म्हणतात. जेव्हा ते सौम्य असते तेव्हा या स्थितीला ऑस्टिओपोरोसिस असे म्हणतात. नखं आणि हार्ड वेगवेगळ्या गोष्टींपासून बनले असले तरी बऱ्याचप्रमाणात एकसारखेच असतात. यासाठीच नखं खराब होणं हे हाडांच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे. कॅल्शियमच्या कमतरतेनं नखांची वाढ कमी होते फक्त कॅल्शियमच नाही तर शरीरात इतर पोषक तत्वांची कमतरता असल्यासही नखांची वाढ कमी वेगानं होते.
कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी काय खावं?






