फोटो सौैजन्य: गुगल
बऱ्य़ाचदा जीवनशैलीत चुकीचे बदल झाल्यामुळे याचा परिणाम हा शरीरावर होतो. जेवणाच्या चुकीच्या वेळा चुकीचा आहार यासगळ्यामुळे बऱ्याच शारीरिक व्याधी सुरु होतात. त्यातील एक म्हणजे अनेकांना सतत डोकेदुखीचा त्रास होतो. सततच्या डोकेदुखीमुळे दिवसभर कामात लक्ष न लागणं किंवा मग सतत थकल्यासारखं वाटणं यांसारख्या समस्या निर्माण होतात. याला चुकीचा आहार जसा कारणीभूत आहे तसाच शरीरातील काही व्हिटामीन्सची कमतरता असल्यास देखील सतत डोकं दुखण्याची समस्या निर्माण होते.
शरीरात व्हिटांमीन बी 12 ची कमतरता निर्माण झाली की, डोकेदुखीचा त्रास जाणवतो. व्हिटामीन बी 12 मुळे शरीराला पोषक घटक मिळतात. याच्या कमतरतेमुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे सतत डोकेदुखी होण्याची समस्या निर्माण होते. व्हिटांमीन बी 12 मुळे तांबड्या पेशी वाढण्यास मदत होते. यामुळे मेंदू आणि शरीरातील इतर अवयवांना यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा होतो. मात्र जेव्हा बी 12 ची कमतरता निर्माण होते त्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि मेंदूला रक्तपुरवठ्यातून मिळणाऱ्या ऑक्सिजनला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मेंदूचं आरोग्य बिघडतं.त्यामुळे सतत डोकेदुखीची समस्या होते.
1) सतत थकल्यासाखं वाटणं
2) सतत झोप येणं
3) बी 12 च्या कमतरेमुळे मायग्रेनचा त्रास देखील संभवतो.
4) हात पाय दुखणं
5) आळस येणं
तज्ज्ञांच्या मते तुम्हाला लक्षणं दिसली तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशी लक्षणं शरीरात जाणवल्यास आहारात काही बदल करणं देखील आवश्यक आहे. आहारात दूध, अंडी आणि मासे यांचा समावेश केल्यास व्हिटामीन बी 12 ची मात्रा वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर सतत डोकं दुखण्यास योग्य ते निदान वैद्यकीय सल्ल्याने नक्की करा असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.