मधुमेह झाल्यानंतर आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
जगभरात मधुमेह या गंभीर आजाराने अनेक रुग्ण त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते, जे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. अनेकदा शरीरात मधुमेहाची लक्षणे दिसू लागल्यानंतर लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र असे केल्यामुळे शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. मधुमेह झाल्यानंतर शरीरात गंभीर आजार वाढण्याची जास्त शक्यता असते. कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी आजार वाढू लागतात. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींकडे योग्य लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. ज्यामुळे पचनक्रिया बिघडणे, शरीरात साखरेचे प्रमाण वाढणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. चुकीचा आहार, सतत गोड पदार्थांचे सेवन, अपुरी झोप इत्यादीमुळे आरोग्य बिघडते. आज आम्ही तुम्हाला मधुमेह झाल्यानंतर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहील.
सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर अनेक लोक ओट्स बनवून खातात. ओट्सचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये अजिबात साखर आढळून येत नाही. टाइप-२ मधुमेह असलेल्या लोकांनी रोजच्या नाश्त्यात ओट्सचे सेवन करावे. तुम्ही घरी मसाला ओट्स किंवा दुधात तयार घालून केलेले ओट्स बनवून खाऊ शकता.
सर्वच ऋतूंमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्या उपलब्ध असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेले घटक आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. या भाज्यांचे सेवन करणे अनेकांना आवडत नाही, मात्र रोजच्या आहारात या भाज्यांचे सेवन केल्यास शरीराला कॅल्शियम मिळेल.पालक, मुळा, लाल माठ इत्यादी हिरव्या भाज्यांचे नियमित सेवन करावे. याशिवाय शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण मधुमेह आणखीन वाढवू शकतो. त्यामुळे हिरव्या भाज्या नियमित खाव्यात.
ब्लूबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी इत्यादी बेरीजचे नियमित सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणात राहील आणि शरीराला अनेक फायदे होतील. यामध्ये आढळून येणारे अँटीऑक्सिडंट्स शरीरासाठी अतिशय महत्वाचे ठरतात., बेरिजमध्ये साखरेचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित बेरीज खावी.
बाहेर प्रवासाला जाताना महिलांनी ‘या’ पद्धतीने घ्यावी आरोग्याची काळजी, स्वतःच करा स्वतःचे रक्षण
मासे खायला सगळ्यांचं खूप आवडतात. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही नियमित माशांचे सेवन करू शकता. माशांचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि आरोग्याला हानी पोहचत नाही. याशिवाय टाईप २ मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांनी नियमित आहारात माशांचे सेवन करावे.