पोटावरील चरबीचा घेर कमी करण्यासाठी फॉलो करा 'हे' सोपे उपाय:
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीराचे वाढलेले वजन आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. पोटावर चरबीचा घेर वाढल्यानंतर तो कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. प्रोटीनशेक, घरगुती उपाय, आहारतज्ञांकडून डाईट घेणे, वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र काहीवेळा हे उपाय करूनसुद्धा पोटावर वाढलेली चरबी कमी होत नाही. चुकीच्या पद्धतीने डाईट फॉलो केल्यामुळे शरीराचे वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढतं जाते. त्यामुळे पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी योग्य उपाय करावे.(फोटो सौजन्य – iStock)
मधुमेह झाल्यानंतर आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, रक्तातील साखरेचे प्रमाण कायम राहील नियंत्रणात
वाढलेले अतिरिक्त वजन आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाब वाढू लागतो. याशिवाय लिव्हरसबंधित आजार झाल्यानंतर शरीराच्या कार्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य आहार आणि व्यायाम करून पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करावा. आज आम्ही तुम्हाला पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे अतिरिक्त चरबी कमी होऊन तुम्ही निरोगी आणि स्लिम राहाल.
शरीराचे वाढलेले अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी योग्य आणि शरीराला पचन होईल अशाच पदार्थांचे सेवन करावे. अनेक महिला पुरुष वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचे जेवण करणे टाळतात. मात्र ही चुकीची सवय आहे. जास्त वेळ उपाशी राहिल्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊन थकवा किंवा अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. तसेच आहारात कमी कलरिजयुक्त पदार्थांचे सेवन करावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.
वजन कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात साखरयुक्त पदार्थांचे सेवन वजन आणखीनच वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात साखरयुक्त आणि प्रोसेस्ड पदार्थांचे सेवन करू नये. कार्बोनेटेड ड्रिंक्स, बेकरी पदार्थ, पेस्ट्री, मैद्याचे पदार्थ आणि अधिक गोड पदार्थ खाल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. या पदार्थांच्या सेवनाऐवजी आहारात गूळ, मध किंवा कमी साखरयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
अनेकांना जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असते. मात्र या सवयीमुळे शरीर सक्रिय राहत नाही. शरीरात शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे पचनसंस्था बिघडते. याशिवाय शरीराच्या कार्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी नियमित व्यायाम किंवा प्राणायाम करणे आवश्यक आहे.