सकाळी उपाशी पोटी करा 'या' हिरव्या चहाचे सेवन, पोटावर वाढलेली चरबी होईल कमी
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते तर कधी प्रोटीनशेक पिऊन वजन कमी केले जाते. मात्र प्रोटीनशेक प्यायल्यामुळे किडनीच्या आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन कमी करताना आहारात कोणत्याही प्रोटीनशेकचे सेवन करू नये. वजन कमी करण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या शेंगांचे आहारात सेवन करू शकता. शेवग्याच्या भाजीपासून शेंगाची भाजी, शेव, चिक्की, सूप, चटणी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगांचा चहा बनवण्याची कृती आणि यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
पित्ताशयात वाढतील खड्डे! रोजच्या आहारात चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीरात सतत वाढेल पित्त
शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते आणि शरीराचे कार्य सुरळीत चालू राहते. महिलांच्या आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगा अतिशय गुणकारी आहेत. या शेंगांचे सूप लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं प्यायला दिले जाते. शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवताना त्याच्या वरील साली फेकून दिल्या जातात. मात्र साली फेकून न देता त्यांच्यापासून तुम्ही सालींपासून चहा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया चहा बनवण्याची कृती.
शेवग्याच्या शेंगांमध्ये फायबर, प्रोटीन आणि जीवनसत्त्व इत्यादी अनेक घटक आढळून येते. यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते. शेवग्याच्या शेंगा खाल्यामुळे हाडांना योग्य ते पोषण मिळते. हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचे सूप प्रभावी ठरेल. वाढलेले वजन कमी करताना आहारात कोणत्याही चुकीच्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी आहारात शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे. यामुळे स्नायूंची ताकद टिकून राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात.






