पित्ताशयात वाढतील खड्डे! रोजच्या आहारात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन
दैनंदिन आहारात सतत तेलकट किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे पोटात वाढलेली जळजळ, ऍसिडिटी, अपचन, गॅस इत्यादी अनेक आरोग्यसंबंधित समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा मेडिकलमध्ये उपलब्ध असलेल्या गोळ्यांचे सेवन करावे. गोळ्यांचे सेवन केल्यामुळे काही वेळा पुरता आराम मिळतो, मात्र पुन्हा एकदा अपचनाची समस्या उद्भवू लागते. आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार, शरीरात पित्त वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. पित्तदोष म्हणजे शरीरातील अग्नी किंवा उष्णतेचा असंतुलित प्रवाह. पित्ताच्या समस्येपासून आराम मिळ्वण्यासाठी आहारात कोणत्याही चुकीच्या पदार्थांचे सेवन करू नये.(फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पित्ताची समस्या प्रामुख्याने उद्भवते. शरीरात वाढलेले पित्त आरोग्याला हानी पोहचवते. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे पोट स्वच्छ असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात पित्त वाढू नये म्हणून आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ पोट आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतील. पित्त वाढल्यानंतर दुर्लक्ष केल्यास शरीराला आणखीनच हानी पोहचते.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये दही ताकाचे सेवन केले जाते. यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि शरीर हायड्रेट राहते. पण अतिप्रमाणात दही ताकाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार, रात्री किंवा जेवणानंतर लगेच दही खाल्यामुळे पोटात ऍसिडिटी वाढू लागते. दह्यामध्ये असलेला आंबटपणामुळे त्यात सजीव सूक्ष्मजंतू तयार होतात, ज्याचा परिणाम पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे दही ताकाचे सेवन कोणत्याही वेळी करू नये.
विटामिन सी युक्त आंबट फळे शरीरासाठी अतिशय गुणकारी आहेत. या फळांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. आहारात संत्री, मोसंबी, अननस, आंबट कैरी किंवा लिंबाच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीरात जळजळ वाढणे किंवा आम्ल्पित्ता तयार होते. हे पित्त शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे. शरीरात पित्त साचून राहिल्यामुळे पित्ताचे खड्डे होण्याची जास्त शक्यता असते.
Sana Makbul ला झालाय Liver Cirrhosis, किती धोकादायक आहे ‘हा’ आजार; जाणून घ्या 6 लक्षणे
रोजच्या आहारात कमीत कमी प्रमाणात मसालेदार, तिखट, तेलकट पदार्थ खावे. मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया बिघडून जाते. बटाटेवडे, समोसे, पकोडे इत्यादी तळलेले आणि मिरची, हिंग, गरम मसाले वापरून तयार केलेल्या पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन करू नये. शरीरात वाढलेल्या ऍसिडिटीमुळे छातीमध्ये सतत जळजळ होणे, छातीमध्ये वेदना, व्यवस्थित झोप न लागणे, चिडचिड होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.