(फोटो सौजन्य: istock)
आजच्या धकाधकीच्या जीवनात वजन वाढणं ही एक सामान्य समस्या बनली आहे. वाढलेलं वजन केवळ सौंदर्यावर परिणाम करत नाही, तर आरोग्यावरही गंभीर परिणाम घडवू शकतो. यासाठी अनेकजण महागड्या जिममध्ये जातात, तासन्तास कसरत करतात, डाएटिंग करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, वजन कमी करण्यासाठी जिमला जाणं किंवा खर्चिक व्यायामशाळा करणे हेच एकमेव उपाय नाही. फक्त चालण्याच्या सवयीमुळेही तुम्ही वजनावर नियंत्रण मिळवू शकता.
हे शक्य आहे काही खास प्रकारच्या वॉकिंग एक्सरसाईजेसमुळे… या पद्धती जर तुम्ही दररोज फक्त ३०-४५ मिनिटे नियमित केल्या, तर १५ दिवसांतच तुम्हाला शरीरात बदल जाणवायला लागेल. चला तर पाहूया कोणत्या आहेत त्या परिणामकारक वॉकिंग पद्धती.
पॉवर वॉकिंग (Power Walking)
पॉवर वॉकिंग म्हणजे जलद गतीने चालणं. ही चालणं सामान्य वॉकिंगपेक्षा थोडी जास्त स्पीडमध्ये केली जाते. चालताना पाठ सरळ ठेवायची, खांदे रिलॅक्स, आणि हात नैसर्गिकरीत्या जोरात पुढे-पाठी हालवायचे. यामुळे संपूर्ण शरीर सक्रिय राहतं. रोज ३० मिनिटं पॉवर वॉकिंग केल्याने हृदयाचे कार्य सुधारते, ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि मेटाबॉलिझम तेजीत काम करतं. यामुळे कॅलोरी झपाट्याने बर्न होते आणि चरबी कमी होते.
इंटरवल वॉकिंग (Interval Walking)
ही वॉकिंग पद्धत थोडी वेगळी आणि प्रभावी आहे. यामध्ये चालण्याची गती मधूनमधून बदलली जाते. उदाहरणार्थ, १ मिनिट वेगात चालणं, नंतर २ मिनिटं नॉर्मल स्पीडने. मग पुन्हा वेगात. या प्रकारामुळे शरीराला सवय लागत नाही आणि अधिक ऊर्जा खर्च होते. इंटरवल वॉकिंगमुळे हृदयाचे आरोग्य सुधारतं, स्टॅमिना वाढतो आणि वजन झपाट्याने कमी होतं. तसेच हे तणाव कमी करण्यातही मदत करतं.
वॉकिंग लंजेस (Walking Lunges)
ही वॉकिंग पद्धत थोडी मेहनतीची असली तरी अत्यंत फायदेशीर आहे. प्रत्येक पावलात गुडघ्याला वाकवून लंजेस पोझिशनमध्ये यावं लागतं. यामुळे मांड्या, नितंब आणि पाय मजबूत होतात. या एक्सरसाईजमुळे तुमचं बॉडी पोस्चर सुधरतं, खालच्या भागातील चरबी कमी होते आणि स्नायूंना योग्य टोन मिळतो. वजन कमी करण्याबरोबरच शरीर लवचिक आणि संतुलित होतं.
वेट लिफ्टिंग वॉकिंग (Weight Lifting Walking)
चालताना हातात थोडं वजन (जसे की १-२ किलोचे डंबेल्स) घेतल्यास ती वेट लिफ्टिंग वॉकिंग ठरते. यामध्ये चालतानाच वरच्या अंगातील स्नायूंवर ताण येतो. यामुळे मसल्स बळकट होतात, शरीराची सहनशक्ती वाढते आणि कॅलोरी अधिक प्रमाणात बर्न होते. सुरुवातीला हलकं वजन घ्या आणि हळूहळू ते वाढवा. रोज फक्त १५-२० मिनिटे या पद्धतीने चालल्यास शरीराला पूर्ण व्यायाम होतो.
नॅचरल किंवा रीलॅक्स वॉकिंग
शेवटी सर्वात सोपी आणि नैसर्गिक पद्धत म्हणजे शांतपणे, नियमित चालणं. जे लोक दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करतात, त्यांच्या साठी दररोज ४०-६० मिनिटं चालणं अत्यंत आवश्यक आहे.
नैसर्गिक चालणं तुमचं संपूर्ण शरीर कार्यरत ठेवतं, पाचन सुधारतं, ब्लड प्रेशर नियंत्रित करतं आणि मन शांत ठेवतं. सकाळी किंवा संध्याकाळी फक्त मोकळ्या हवेत चालणं सुद्धा तुमच्या आरोग्यासाठी अमूल्य ठरू शकतं.
या टिप्स लक्षात ठेवा