'या' पद्धतीने नियमित करा हळदीचे सेवन! हंसा योगेंद्र यांनी सांगितलेला प्रभावी उपाय
हळदीचे शरीराला होणारे फायदे?
हळदीमध्ये कोणते घटक आढळून येतात?
हाडांच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी उपाय?
भारतीय स्वयंपाक घरात कायमच हळद उपलब्ध असते. हळदीचा वापर जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. जेवणात हळद टाकल्यास पदार्थाचा सुगंध आणि चव वाढते. यासोबतच हळदीच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. हळदीमध्ये असलेले औषधी गुणधर्म शरीरासाठी औषधाप्रमाणे असतात. त्यामुळे जेवण बनवताना आवर्जून हळदीचा वापर करावा. आयुर्वेदामध्ये हळदीला खूप जास्त महत्व आहे. रोजच्या आहारात किंवा महिनाभर हळदीच्या दुधाचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. तब्येत चांगली राहण्यासाठी हळदीचा आहारात समावेश करावा. आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध योग गुरू हंसा योगेंद्र यांनी हळदीचे सेवन केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात ही ७ लक्षणे दिसली तर सावध व्हा! डायबिटीज होण्याची अफाट शक्यता
हळदीमध्ये असलेले गुणकारी घटक शरीराच्या आतील अवयवांना आलेली सूज कमी करतात आणि आरोग्य सुधारतात. यामध्ये असलेले एंटी इंफ्लेमेटरी गुण सांध्यांच्या वेदना, ऑस्टिओआर्थरायटिसपासून कायमचा आराम मिळवून देतात. बऱ्याचदा जखम झाल्यानंतर किंवा कुठेही पडल्यानंतर मुका मार लागल्यास हळद लावली जाते. यामुळे सूज कमी होते आणि जखम भरण्यास मदत होते. हळदीमध्ये असलेले अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी सेप्टीक घटक जखम भरण्यास मदत करतात. शरीराच्या कोणत्याही अवयवावर झाली जखम लवकर भरून काढण्यासाठी नियमित हळदीच्या दुधाचे सेवन करावे.
मेंदूची स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी हळदीचे सेवन करावे. हळदीतील करक्यूमीन मेंदू कमकुवत होऊ देत नाही. मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हळदीचे आहारात सेवन करावे. मेमरी लॉसचा धोका टाळण्यासाठी नियमित हळद दूध किंवा हळदीचा समावेश असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. यासोबतच शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधरण्यासाठी नियमित हळद दुधाचे सेवन करावे. याशिवाय चांचभर आल्याचा रस घेऊन त्यात हळद आणि काळीमिरी पावडर मिक्स करून प्यायल्यास इम्युनिटी वाढेल.
हळद शरीरसोबतच त्वचेसाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. हळदीमध्ये असलेले घटक चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि पिंपल्स घालवण्यासाठी मदत करते. त्यामुळे हळद, दूध आणि बेसन मिक्स करून तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा खूप जास्त उजळदार होईल. तसेच पोटाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्यात चिमूटभर हळद मिक्स करून प्यावी.






