'या' पदार्थांच्या सेवनामुळे हृदयाचे ठोके होतात कायमचे बंद
भारतासह जगभरात हार्ट अटॅकच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. हृदयाचे कार्य बिघडल्यानंतर हृयदविकाराचा झटका येणे किंवा स्ट्रोक इत्यादी गंभीर समस्या उद्भवू लागतात. यासर्व आजारांना चुकीची जीवनशैली आणि आहारातील पदार्थ कारणीभूत आहेत. आहारात सतत होणारे बदल, तिखट तेलकट पदार्थ, अपुरी झोप,धूम्रपान, पोषक तत्वांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात निर्माण झालेला शारीरिक हालचालींचा अभाव आणि बिघडलेले मानसिक आरोग्य इत्यादींमुळे शरीरात अनेक नकारात्मक बदल दिसून येतात. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडते.(फोटो सौजन्य – iStock)
नाकाच्या शस्त्रक्रियेतील चुकीमुळे प्रियांका चोप्रा ‘या’ समस्यांनी त्रस्त, जाणून घ्या सविस्तर माहिती
दैनंदिन आहारात सेवन केल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे हृद्यासह संपूर्ण शरीराचे कार्य बिघडण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला रोजच्या आहारात सेवन केले जाणारे कोणते पदार्थ हृदयाचे ठोके कायमचे बंद करून टाकतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थ आरोग्यासाठी विषासमान आहेत. त्यामुळे या पदार्थांचे आहारात सेवन करू नये. अतिसेवन केल्यास आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते.
चवीला गोड लागणारी साखर आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामध्ये असलेले गुणधर्म रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवतात. साखरेचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीरातील ईन्सुलीनची पातळी असंतुलित होते, ज्यामुळे मधुमेह वाढतो. मधुमेहासह लठ्ठपणा, वाढलेले वजन, उच्च रक्तदाब, हृदयविकार इत्यादी आजार वाढण्याची भीती असते. त्यामुळे रोजच्या आहारात कमीत कमी साखरेचे सेवन करावे. गोड पेय, चॉकलेट, साखर युक्त पदार्थ खाऊ नयेत.
भात खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटत नाही. अनेक लोक संध्याकाळच्या जेवणात नेहमीच भात खातात. पांढऱ्या रंगाच्या तांदुळांमध्ये फायबर आणि पोषक घटक कमी असतात, ज्यामुळे जेवलेले अन्नपदार्थ लवकर पचन होतात आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. आहारात नेहमीच भात खाल्यास मधुमेह,लठ्ठपणा इत्यादी आजार वाढतील, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये ब्रेड बटर किंवा पाव आणून खाल्ले जातात. पण नेहमी नेहमी मैद्याचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. ब्रेड, नूडल्स, पिझ्झा आणि बिस्किटे हे पदार्थ बनवण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो. या पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रिया बिघडते आणि रक्तातील साखर झपाट्याने वाढू लागते.
बबट्यापासून बनवलेले पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतात. पण सतत बटाट्याचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. अतिप्रमाणात बटाट्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. चिप्स आणि फ्रेंच फ्राईज सतत खाल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढून रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर साचून राहतो. त्यामुळे आहारात बटाटा खाण्याऐवजी पालेभाज्या, गाजर, बीट, फळे इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.