(फोटो सौजन्य: Pinterest)
जलेबी हा भारताचा एक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध गोडाचा प्रकार आहे. यात मैदाच्या पीठापासून तयार केलेली कुरकुरीत जलेबी गोड साखरेच्या पाकात बुडवली जाते. कुरकुरीत जलेबीला गोड पाकात बुडवल्याचे संमिश्र चवीला फार अप्रतिम लागते आणि म्हणूनच भारतीयांची ही एक आवडती मिठाई बनली आहे. सध्या सणसमारंभाचा काळ सुरु आहे. श्रावण सुरु असतानाच काही दिवसांतच गणेशाचे आगमण होणार अशात नैवेद्यासाठी जर तुम्ही घरी एक चवदार आणि गोडाचा पदार्थ बनवू इच्छित असाल तर जलेबी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
बाजारात तर जलेबी मिळतेच पण घरी बनवलेली जलेबी ही अधिक ताजी आणि आपल्या आवडीनुसार बनवता येते. जलेबीची रेसिपी फार सोपी आहे, ज्यामुळे तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने या डिशची रेसिपी ट्राय करु शकता. घरी पदार्थ बनवण्याची फायदा असा असतो की, यात आपल्या हाताची आणि प्रेमाची एक अनोखी चव मिसळली जाते. शि्वाय कमी पैशात जास्त प्रमाणात पदार्थ बनवता येतो, ज्याने मन आणि पोट दोन्ही भरलं जातं. चला तर मग जाणून घेऊया जलेबी बनवण्याची एक सोपी रेसिपी.
साहित्य
कृती
जलेबीची उत्पत्ती कुठून झाली?
जिलेबीची उत्पत्ती भारतीय उपखंडात झाली असे मानले जाते आणि ती पर्शियन मिष्टान्न, झलाबीपासून प्रेरित असल्याचे मानले जाते.






