(फोटो सौजन्य: Pinterest)
जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी आपल्या अलौकीक सुंदरतेची किंवा त्या ठिकाणच्या इतिहासासाठी खास करून ओळखली जाते. या ठिकाणांचे सौंदर्य पाहताच आपल्याला त्या ठिकाणांना भेट द्यायची इच्छा वाटू लागते. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, जगात अशीही काही ठिकाणे आहेत जी आपल्या जिथले दृश्य इतके भयाण आहे की, इथे जायला लोकांना कापरा भरतो. आज आम्ही तुम्हाला जगातील अशा एक भयानक ठिकाणाविषयी सांगत आहोत, जिथला इतिहास ऐकून कोणत्याही सामान्य माणसाच्या अंगावर काटा येईल. हे ठिकाण कोणते साधे-सुधे ठिकाण नसून इथे शेकडो माणसांची हाडे विखुरलेली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हे ठिकाण इतक्या हाडांनी व्यापलेले आहे की त्याला सांगाड्यांचे बेट असे नाव पडले आहे. आता तुम्हीच विचार करा, ज्या बेटाचे नावाचं सांगाड्यांचे बेट असेल तिथे किती साऱ्या सांगाड्यांचं वास्तव असेल… १८ व्या आणि १९ व्या शतकादरम्यान या बेटावर काहीतरी घडले, ज्याचे पुरावे अजूनही इकडे तिकडे विखुरलेले असल्याचे सांगितले जाते. या जागेचे फोटोज इतके भयाण आहेत की, ते पाहून कोणाची रात्रीची झोप सहज उडू शकते. इथे मानवी हाडे आणि दात देखील येथे विखुरलेले असल्याचे सांगितले जाते. या हाडांमुळेच या ठिकाणाला डेडमॅन आयलंड असे नाव पडले आहे.
सांगाड्यांचे बेट बनले आहे हे ठिकाण
मिररच्या वृत्तानुसार, गेल्या २०० वर्षात कोणीही या ठिकाणी भेट दिलेली नाही कारण येथे सांगाडे, हाडे आणि मानवी अवशेषांशिवाय काहीही नाही. माहितीनुसार, हे ठिकाण लंडनपासून ४० मैल अंतरावर वसले असून पूर्वीच्या काळी इथे कैद्यांना पुरवण्यात येत असल्याचे सांगितले जाते. २०० वर्षांपर्यंत, इथे कैद्यांना जहाजांमधून घेऊन आणले जायचे आणि मग त्यांना या ठिकाणी सोडले जायचे. परिणामी, येथे येऊन त्यांची हाडे हळूहळू नष्ट व्हायची आणि मग हळूहळू त्यांचा या ठिकाणी खातमा व्हायचा. इथे आजची त्यांची हाडे आणि दात विखुरलेले आढळतात. इथे आणलेल्या शवपेट्या आजही इथे उघड्या पडलेल्या दिसून येतात.
या ठिकाणी चुकूनही जाऊ नका! सिंगापूरसह अनेक देशांनी जारी केली Travel Advisory; सावध व्हा
२०१७ मध्ये, बीबीसीने विशेष परवानगीने येथे प्रवेश केला. त्याची प्रेजेंटर नताली ग्राहम हिने हे बेट पाहिल्यावर सांगितले की, इथले दृश्य फार विचित्र आहे आणि असे दृश्य तिने आजवर कधीही पृथ्वीवर असल्याची कल्पना केली नव्हती. इथले भयाण चित्र ती कधीही विसरू शकणार नाही. तिच्या साथीदाराने सांगितले की, इथले दृश्य कोणत्याही हॉरर चित्रपटातून कमी नव्हते, इथे फक्त हाडे आणि शवपेटी होत्या. या ठिकाणाबाबत अनेक कथा सांगितल्या जातात, काही लोक म्हणतात की इथे फक्त मृत लोकच राज्य करतात किंवा इथे राक्षसांनी येऊन लोकांना खाल्ले आणि त्यांचे मेंदू हिरावून घेतले. तथापि, इतिहास सांगतो की येथे २०० वर्षे कैद्यांना ठेवण्यात आले होते; त्यांना तरंगत्या जहाजांमध्ये ठेवण्यात आले. यामध्ये ऑस्ट्रेलियाला नेण्यात आलेल्या पाकीटमार मुलांचाही समावेश होता. जे आजारी पडायचे ते जहाजाच्या डेकवरच मरायचे आणि त्यांचे अवशेष या बेटावरच पुरून जायचे.