ता : 29 – 6 – 2023, गुरुवार
तारीख – संवत्सर
मिती 8, शके 1945, विक्रम संवत 2080, उत्तरायण उन्हाळा, आषाढ शुक्ल पक्ष एकादशी 26:41,
सूर्योदय – 5:46 सूर्यास्त – 7:04
सूर्योदयाच्या वेळी नक्षत्र – स्वाती 16:29, योग – सिद्ध 27:42, साध्या नंतर, करण – वणिज 15:06, व्यष्टी 26:41 नंतर, बाव नंतर
सण – देव शयनी एकादशी, पंढरपूर यात्रा, चातुर्मास प्रारंभ, बकरी ईद
भद्रा – पहाटे 3:06 ते दुपारी 2:41 पर्यंत
राहू काळ – दुपारी १:३० ते ३:००
शुभ रंग – वायलेट, पिवळा, निळा, गुलाबी
शुभ अंक – 3, 6, 9
शुभ रत्न – गुरूसाठी पुष्कराज
२०२२: उद्धव ठाकरे – महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री, यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
२००७: आयफोन – अँपल कंपनीने पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.
२००१: कृष्ण दामोदर अभ्यंकर – यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.
१९८६: फुटबॉल विश्वकप – आर्जेन्टिना फुटबॉल संघाने १९८६ चा फुटबॉल विश्वकप जिंकला.
१९७६: सिशेल्स – देशाला इंग्लंड पासून स्वातंत्र्य मिळाले.
१९७५: स्टीव्ह वोजनियाक यांनी अँपल -१ संगणकाचे पहिले प्रोटोटाइप तपासले.
१९७४: इसाबेल पेरेन – यांनी अर्जेंटिनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
१९७१: सोयुझ ११ अंतराळ दुर्घटना – क्रू कॅप्सूलमध्ये दबाव आल्यामुळे अपघातात जॉर्जी डोब्रोव्होल्स्की, व्लादिस्लाव वोल्कोव्ह आणि व्हिक्टर पटसायेव अंतराळवीर यांचे निधन. अवकाशात निधन झालेले हे पहिले व्यक्ती आहेत.
१९५२: मिस युनिव्हर्स, १९५२ – पहिली मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली यात फिनलंडच्या आर्मी कुसेलाने किताब जिंकला.
१९५०: कोरियन युद्ध – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस ट्रुमन यांनी कोरियाची सागरी नाकेबंदी अधिकृत केली.
१८७१: ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला.
१९५६: पेद्रोसंताना लोपेस – पोर्तुगालचे पंतप्रधान
१९४६: अर्नेस्टोपेरेझ बॅलादारेस – पनामाचे राष्ट्राध्यक्ष
१९४५: चंद्रिका कुमारतुंगा – श्रीलंकेच्या ५व्या राष्ट्राध्यक्षा
१९३४: कमलाकर सारंग – निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक (निधन: २५ सप्टेंबर १९९८)
१९०८: प्रतापसिंग गायकवाड – बडोद्याचे महाराज (निधन: १९ जुलै १९६८)
१८९३: प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युटचे संस्थापक – पद्म विभूषण (निधन: २८ जून १९७२)
१८९१: डॉ. प. ल. वैद्य – प्राच्यविद्यासंशोधक (निधन: २५ फेब्रुवारी १९७८)
१८७१: श्रीपादकृष्ण कोल्हटकर – प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक (निधन: १ जून १९३४)
१८६४: आशुतोष मुखर्जी – शिक्षणतज्ज्ञ व वकिल
१८३२: संत रफ्का – लेबनॉनच्या पहिल्या महिला संत (निधन: २३ मार्च १९१४)
२०११: के. डी. सेठना – भारतीय कवी, विद्वान आणि लेखक (जन्म: २६ नोव्हेंबर १९०४)
२०१०: प्रा. शिवाजीराव भोसले – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: १५ जुलै १९२७)
२००३: कॅथरिन हेपबर्न – हॉलिवूड अभिनेत्री (जन्म: १२ मे १९०७)
२०००: वासुदेव श्रीपाद बेलवलकर – ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन (जन्म: १८ फेब्रुवारी १९११)
१९९३: विष्णुपंत जोग – गायक आणि अभिनेते
१९९२: मोहंमद बुदियाफ – अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष
१९९२: शिवाजीराव भावे – सर्वोदयी कार्यकर्ते
१९८१: दिगंबर मोकाशी – मराठी कथा कादंबरीकार (जन्म: २७ नोव्हेंबर १९१५)
१९७१: जॉर्जी डोब्रोव्होल्स्की – सोव्हिएत अंतराळवीर, व्लादिस्लाव वोल्कोव्ह आणि व्हिक्टर पटसायेव यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती (जन्म: १ जून १९२८)
१९७१: व्लादिस्लाव वोल्कोव्ह – सोव्हिएत अंतराळवीर, जॉर्जी डोब्रोव्होल्स्की आणि व्हिक्टर पटसायेव यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती (जन्म: २३ नोव्हेंबर १९३५)
१९७१: व्हिक्टर पटसायेव – सोव्हिएत अंतराळवीर, व्लादिस्लाव वोल्कोव्ह आणि व्लादिस्लाव वोल्कोव्ह यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती (जन्म: १९ जून १९३३)
१९६६: दामोदर धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार (जन्म: ३१ जुलै १९०७)
१८९५: थॉमस हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक (जन्म: ४ मे १८२५)
१८७३: मायकेल मधुसूदन दत्त – बंगाली कवी (जन्म: २५ जानेवारी १८२४)