विटामिन सी ची कमतरता दिसू लागल्यानंतर शरीराच्या 'या' भागांमध्ये होऊ लागतात वेदना
निरोगी आरोग्यासाठी शरीरात विटामिन सी असणे अतिशय आवश्यक आहे. कारण शरीरात विटामिन सी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्वचा, केस याशिवाय शरीरातील इतर अवयवांसाठी विटामिन सी अतिशय महत्वाचे आहे. शरीरात विटामिन सी कमतरता जाणवू लगल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे नियमित सेवन करावे. साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी दैनंदिन आहारात विटामिन सी चे सेवन करावे. लिंबू, पपई, किवी इत्यादी विटामिन सी युक्त पदार्थ खाल्यामुळे शरीराला पोषण मिळते आणि आरोग्य निरोगी राहते.(फोटो सौजन्य – iStock)
पोटावरील चरबी कायमची होईल कमी! दैनंदिन आयुष्यात फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, राहालं कायम फिट
चुकीचा आहार, अपुरी झोप, पोषण तत्वांचा अभाव इत्यादी गोष्टींची शरीरात कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्य बिघडू लागते. त्यामुळे त्यामुळे नियमित विटामिन सी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. विटामिन सी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडांचे दुखणे, त्वचा काळवंडणे, त्वचेवर सुरकुत्या किंवा पिंपल्स येणे, थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात विटामिन सी कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरातील कोणत्या अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
शरीरात विटामिन सी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे हिरड्यांमधून रक्त येणे किंवा हिरड्यांना सूज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या लक्षणांकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात, मात्र असे केल्यामुळे आरोग्याला जास्त हानी पोहचण्याची शक्यता असते. विटामिन सी कमी झाल्यानंतर शरीरात कोलेजनचे उत्पादन कमी होऊन जाते. त्यामुळे आहारात विटामिन सी युक्त पदार्थ खावेत.
विटामिन सी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित आहारात गाजर, बीट, काकडी इत्यादी भाज्यांचे आणि फळांचे सेवन करावे. डोळ्यांना दुखापत होणे, डोळ्यांची दृष्टी कमकुवत होणे, डोळ्यांमध्ये जखम झाल्यासारखे वाटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे डोळ्यांची समस्या उद्भवू नये म्हणून विटामिन सी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
जखम, दुखापत झाल्यानंतर झालेली जखम बरी होण्यास जास्त वेळ लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. विटामिन सीच्या कमतरतेमुळे शरीरातील जखमा बऱ्या होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे. नियमित कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्यास विटामिन सी ची कमतरता दूर होईल.
केवळ दातांसाठीच नाही तर हाडांच्या वेदनेपासूनही सुटका मिळवून देते लवंग, 9 फायदे घ्या जाणून
विटामिन सी च्या कमतरतेमुळे शरीरात सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. याशिवाय शरीरातील लोहाची कमतरता निर्माण होते. यामुळे सांध्यांमधील वेदना वाढू लागतात. तसेच सांध्यांना सूज येणे, लोहाची कमतरता निर्माण होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. विटामिन ची कमतरता दूर करण्यासाठी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे.