नीता अंबानींच्या हेअर स्टायलिस्टने सांगितलेल्या टिप्स
सर्वच महिलांना लांबलचक आणि निरोगी केस हवे असतात. केसांच्या वाढीसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी केसांना शॅम्पू लावणे तर कधी केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी केसांना हेअर मास्क लावला जातो. केसांच्या वाढीसाठी नियमित केसांना तेल लावून हलक्या मसाज करावी. यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि केस सुंदर आणि चमकदार दिसतात. मात्र चुकीच्या पद्धतीने केसांना तेल लावल्यास केस सतत गळू लागतात. केसांची वाढ होण्याऐवजी केसांची वाढ थांबते. याशिवाय केस गळू लागल्यानंतर अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. मात्र त्याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – iStock)
केस सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावून मसाज करावा. यामुळे केसांमधील रक्तभिसरण सुधारते आणि केस सुंदर दिसू लागतात. टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी केसांना तेल लावावे. मात्र केसांना चुकीच्या पद्धतीने तेल लावल्यास केस तुटू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नीता अंबानींच्या हेअर स्टायलिस्टने सांगितलेल्या सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यास केस सुंदर आणि मऊ होतील. याशिवाय केसांची गुणवत्ता सुधारेल.
अमित ठाकूर यांनी इंस्टावर पोस्ट शेअर करत केसांची योग्य पद्धतीने कशी काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे. केसांना तेल लावून मसाज केल्यानंतर केसांना अनेक फायदे होतात. यामुळे केसांची लांबी वाढते आणि केस मजबूत होतात. कोरड्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित केसांना सूट होईल असे तेल लावावे. यामुळे केसांचे टेक्स्चर सुधारण्यास मदत होते. केसांना तेल लावून मसाज केल्यामुळे केसांना अनेक फायदे होतात पण केस गळती थांबते असे त्यांनी स्पष्टपणे म्हंटलेले नाही.
केस गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केसांना वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. यामुळे केसांची वाढ होते आणि केस घनदाट दिसू लागतात. केसांना गरजेपेक्षा जास्त प्रमाणात तेल लावू नये. यामुळे केसांना अतिरिक्त फायदे होत नाहीत. त्यामुळे केसांना पोषण मिळवून देण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
केस गळण्याची अनेक कारण आहेत. शरीरात होणारे हार्मोन्सचे असंतुलन, चुकीची जीवनशैली, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम केसांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी शरीराला पचन होईल अशा आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. अतिप्रमाणात केस गळती होण्यास सुरुवात झाल्यानंतर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. यामुळे केस गळती थांबते.