रक्तातील मधुमेहाची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर शरीरात दिसू लागतात 'ही' लक्षणे
मधुमेहाची लक्षणे?
मधुमेह होण्याची कारणे?
मधुमेह झाल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये?
शरीरसंबंधित मधुमेह हा अतिशय गंभीर आजार आहे. मधुमेह झाल्यानंतर तो कधीच बरा होत नाही. वर्षाच्या बाराही महिने गोळ्या औषधांचे सेवन करावे लागते. जगभरातील असंख्य लोक मधुमेहसारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणारे बदल, पोषक घटकांचा अभाव आणि सतत गोड पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीराला खूप जास्त हानी पोहचते. मधुमेह हा सायलेंट किलर आजार आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने या लक्षणांकडे वाढ होते आणि आरोग्य बिघडते. आज आम्ही तुम्हाला मधुमेहाची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
वयाच्या ४० नंतर आहारात करा ‘या’ पदार्थांचा नियमित समावेश, हाडे राहतील लोखंडाइतकी मजबूत आणि कडक
मधुमेह झाल्यानंतर त्वचेसंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. शिन स्पॉट्स किंवा डायबेटिक डर्मोपॅथी या समस्या प्रामुख्याने मधुमेह झाल्यानंतर उद्भवतात. याला स्पॉटेड लेग सिंड्रोम असे सुद्धा म्हणतात. यामुळे त्वचेवर गोल स्पॉट्स, अंडाकृती स्पॉट्स येऊन त्वचा ब्राऊन किंवा लालसर दिसू लागते. त्वचेवर दिसून येणाऱ्या या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर त्वचेमध्ये कोलेजन जमा होऊ लागते. ज्यामुळे त्वचा खूप जास्त कडक झाल्यासारखी वाटते. मधुमेह झाल्यानंतर त्वचेसंबंधित बरीच लक्षणे दिसू लागतात. या स्थितीला मेडिकल भाषेत स्क्लेरेडेमा डायबेटिकोरम, असे सुद्धा म्हणतात. दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर शरीरावर झालेल्या कोणत्याही लहान मोठ्या जखमा लवकर बऱ्या होत नाही. या जखमा आणखीनच चिघळतात आणि कोणताही अवयव कापावा लागतो. वाढत्या मधुमेहाचा परिणाम रक्तभसिरणावर लगेच दिसून येतो. यामुळे मज्जातंतूचे नुकसान होते. जखमा लवकर बऱ्या न झाल्यामुळे त्या आणखीनच चिघळतात.
रक्तात वाढलेल्या साखरेमुळे त्वचेवर लहान लहान पुरळ दिसू लागतात. हे पुरळ काही केल्या कमी होत नाहीत. ट्रायग्लिसराइडची पातळी वाढल्यानंतर त्वचेवर बारीक बारीक पुरळ येतात आणि त्वचा निस्तेज झाल्यासारखी वाटते. याशिवाय नियंत्रणाबाहेर साखरेची पातळी वाढल्यानंतर मान, काखेकडील भाग किंवा मांड्यांभोवतीची त्वचा पूर्णपणे काळी दिसू लागते.
Ans: शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाही, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.
Ans: सतत खूप तहान लागणे आणि भूक लागणे.
Ans: स्वादुपिंडातून इन्सुलिनची निर्मिती कमी होणे किंवा स्वादुपिंडात बिघाड होणे हे मूळ कारण आहे.






