सुंदर त्वचेसाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
सर्वच महिला सुंदर दिसण्यासाठी सतत काहींना काही उपाय करत असतात. मात्र वाढत्या वयानुसार त्वचेमध्ये अनेक बदल होण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, वांग, पिंपल्स, मुरूम इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. यामुळे त्वचा अधिक वयस्कर आणि निस्तेज दिसू लागते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. मात्र केमिकलयुक्त उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. त्वचेला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे जास्त महत्वाचे आहे. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी महिला महागड्या पार्लरमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी जातात. ट्रीटमेंट केल्यानंतर काहीकाळ त्वचा अतिशय सुंदर दिसते. मात्र पुन्हा एकदा त्वचा निस्तेज आणि खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य – iStock)
वयाच्या चाळिशीनंतर त्वचेमध्ये अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे काही महिला दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्वचेची गुणवत्ता आणि पोत खराब होईल. वयाच्या चाळिशीनंतर चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा, डोळ्याखाली काळे वर्तुळ येणे, त्वचा कोरडी पडणे, त्वचेचा रंग बदलणे, त्वचा अतिसंवेदनशील होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुमहाला वयाच्या चाळीशीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.
वय वाढल्यानंतर त्वचा अधिक ड्राय आणि निस्तेज होऊन जाते. या वयात त्वचेला पोषणाची आवश्यकता असते. त्यामुळे नियमित रात्री झोपण्याआधी त्वचा स्वच्छ करून चेहऱ्यावर टोनर किंवा मॉइश्चरायझर लावावे. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. हायलुरोनिक ॲसिड असलेली स्किन केअर प्रॉडक्ट त्वचेसाठी वापरावेत. ज्यामुळे त्वचा अधिक हायड्रेट राहील. याशिवाय सिरॅमाइड्स असलेल्या प्रॉडक्टचा वापर करावा.
वय वाढल्यानंतर चेहऱ्याचा रंग हळूहळू बदलण्यास सुरुवात होते. याशिवाय सूर्यकिरणांमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे त्वचा काळवंडून जाते. ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. त्वचेवर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी नियमित सनस्क्रीन त्वचेला लावावे. यामुळे सैल झालेली त्वचा घट्ट होते आणि सुरकुत्या कमी होऊन त्वचेची गुणवत्ता सुधारते. सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून सनस्क्रीन लावावे.
पिंपल्स, काळे डाग,मी मुरूम किंवा इतर अनेक कारणामुळे त्वचा खराब होऊन जाते. अशावेळी त्वचेवर सीरम लावून तुम्ही खराब झालेली त्वचा सुधारू शकता. हायलुरोनिक ॲसिड किंवा व्हिटॅमिन सी सीरम, कोलेजन उत्पादन वाढविण्यासाठी पेप्टाइड आधारित क्रीमचा वापर करावा. यामुळे त्वचा अधिक उजळदार आणि सुंदर दिसते.