त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा करा वापर
रोजच्या जेवणात भात हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. काहींना भात खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही. नियमित भाताचे सेवन केले जाते. याशिवाय स्किन केअर रुटीनमध्ये तांदळाचा वापर केला जातो. तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे त्वचा अधिक हायड्रेट आणि उठावदार दिसते. या पाण्यात असलेले गुणधर्म त्वचेसाठी अतिशय महत्वाचे ठरतात. त्यामुळे रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये तुम्ही केमिकलयुक्त टोनरचा वापर करण्याऐवजी तांदळाच्या पाण्यापासून बनवलेल्या टोनरचा वापर करू शकता. हे टोनर त्वचेसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी अतिशय महत्वाचे ठरते. काळवंडलेली त्वचा उजळ्वण्यासाठी टोनरचा वापर करू शकता.(फोटो सौजन्य – iStock)
तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे त्वचा अधिक उठावदार आणि सुंदर दिसते. चेहऱ्यावरील मुरूम, पिंपल्स किंवा ऍक्ने घालवण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. या पाण्याच्या वापरामुळे त्वचा स्वच्छ होते. यामध्ये अॅंटीऑक्सिडेंट, अमीनो अॅसिड आणि स्टार्चचे प्रमाण अधिक असते. त्वचेमध्ये होणारी जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. तांदळाचे पाणी वापरल्यामुळे त्वचेसोबतच केसांनासुद्धा अनेक फायदे होतात.
त्वचा आणि केसांसाठी घरगुती उपाय म्हणून तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. तांदळाचे पाणी त्वचेला आतून पोषण देऊन त्वचा स्वच्छ आणि उजळदार करते. याशिवाय तांदळाचे टोनर बनवण्यासाठी जास्त खर्च देखील होत नाही. या पाण्याचा वापर तुम्ही त्वचा आणि केसांसाठी करू शकता. आज आम्ही तुम्हाला तांदळाच्या पाण्याचे टोनर कसे तयार करावे? उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टोनरचा वापर का करावा? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
तांदळाच्या पाण्याचे टोनर तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीभर तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ३ तास तांदुळ पाण्यात भिजत ठेवा. तांदूळ व्यवस्थित भिजल्यानंतर टोपात तांदळाचे पाणी ओतून शिजवून घ्या आणि त्यातील पाणी बाजूला काढून घ्या. यापद्धतीने तांदळाच्या पाण्याचे टोनर तयार करा. तसेच तांदळाचे पाणी न शिजवता देखील तुम्ही टोनर तयार करून त्वचेवर लावू शकता.
जेवणाआधी प्या ही टेस्टी स्मूदी; वजन झपाट्याने कमी होऊन अंथरुणात पडताच लागेल शांत झोप
तांदळाच्या पाण्यात आढळून येणारे गुणधर्म त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. या पाण्याचा वापर त्वचा आणि केसांसाठी केल्यामुळे स्किन केअरसंबंधित अनेक समस्या दूर होतात. तांदळाचे पाणी कापसाच्या मदतीने त्वचेवर लावल्यास त्वचा आतून स्वच्छ होऊन चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरूम कमी होऊन जातील. त्वचेवर आलेली सूज, जळजळ, उन्हामुळे झालेले टॅनिंग कमी होण्यास मदत होईल.