चेहरा अचानक काळा पडला आहे? लिव्हरसबंधित समस्या उद्भवल्यानंतर त्वचेमध्ये दिसून येतात 'हे' बदल
सुंदर दिसण्यासाठी महिलांसह पुरुषसुद्धा त्वचेची खूप जास्त काळजी घेतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअरचा वापर केला जातो तर कधी फेसपॅक, फेसमास्क आणि स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची खूप जास्त काळजी घेतली जाते. चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी केवळ स्किन ट्रीटमेंट नाहीतर त्वचेची योग्य आहार आणि काळजी घेणे फार आवश्यक आहे. उन्हाळामुळे काळवंडलेली त्वचा गोरीपान करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण त्वचा केवळ उन्हामुळेच नाहीतर शरीरसंबंधितआजारांमुळे सुद्धा काळवंडून जाते. त्वचेचा रंग मेलॅनिन नावाच्या घटकावर अवलंबून असतो. ज्यावेळी मेलॅनिनची पातळी वाढते, तेव्हा त्वचेचा रंग बदलण्यास सुरुवात होते. केवळ सूर्याच्या किरणांमुळेच नाहीतर शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम त्वचेवर दिसून येतो.(फोटो सौजन्य – istock)
Blackheads Removal Tips: चेहऱ्यावरील हट्टी ब्लॅकहेड्सना करा बाय-बाय; ‘हे’ सोपे उपाय ठरतील फायदेशीर
चेहऱ्यावर अचानक आलेले काळे डाग किंवा त्वचेवर वाढलेला काळेपणा लिव्हरच्या आजारांमुळे आणि इन्सुलिनच्या प्रतिकाराशी संबंधित असण्याची शक्यता असते. त्वचा काळी पडल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या क्रीम, लोशन, सीरम तर काहीवेळा महागड्या ट्रीटमेंटसुद्धा केल्या जातात. पण आतून बिघडलेली त्वचेची गुणवत्ता लवकर बरी होत नाही. ताणतणाव, अपुरी झोप आणि रक्तातील अशुद्धी यांचा थेट परिणाम शरीरावरील त्वचेवर पडतो. त्यामुळे त्वचेसंबंधित समस्या वाढल्यानंतर कायमच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. कोणतेही स्किन केअर प्रॉडक्ट किंवा लोशन लावून त्वचेची गुणवत्ता सुधारत नाही. चला तर जाणून घेऊया चेहरा काळवंडण्यामागे काय आहेत कारण आणि त्यावरील उपाय.
शरीरात झालेल्या हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर काळे डाग आणि राखाडी रंग होतो. महिलांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी असंतुलित झाल्यानंतर मेलास्मा होतो. ही समस्या गरोदरपणात किंवा गर्भनिरोधक गोळ्यांच्या अतिसेवनामुळे उद्भवण्याची जास्त शक्यता असते. गालावर, कपाळावर आणि नाकावर गडद रंगाचे स्पॉट्स येऊन त्वचा पूर्णपणे निस्तेज होते.
रक्तात साखरेची पातळी वाढल्यानंतर केवळ लघवी आणि शरीरात बदल होत नाहीतर त्वचेवर सुद्धा अनेक बदल होण्यास सुरुवात होते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर त्वचेचा रंग काळा पडू लागतो. टाईप-२ मधुमेह किंवा पीसीओडी झाल्यानंतर त्वचेच्या रंगात बदल दिसून येतात. रक्तात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्वचा कोरडी पडणे किंवा त्वचा रखरखीत होऊन जाते. रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर त्वचेला आवश्यक ऑक्सिजन पुरवठा होत नाही, ज्याच्या परिणामामुळे चेहरा खूप जास्त काळपट दिसतो.
लिव्हर शरीरासाठी अतिशय महत्वाचा अवयव आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकणे, चांगले पित्त वाढवणे इत्यादी अनेक कामे लिव्हर करते. पण लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर लिव्हर शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्याऐवजी शरीरात तसेच जमा होऊन राहतात. यामुळे डोळ्यांभोवती काळे डाग, चेहरा खराब दिसणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. सतत मोबाईल वापरल्यामुळे त्वचेवर त्याचे परिणाम दिसू लागतात.
त्वचेच्या समस्या वाढल्यानंतर केवळ वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. घरात असतानाही SPF 30 युक्त सनस्क्रीन लावावे. यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आणि मोबाईलच्या स्क्रीनमुळे होणारे टॅनिंग होत नाही. याशिवाय आहारात भरपूर पाणी आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. संत्री, आवळा आणि पपई यांसारख्या विटामिन सी युक्त फळांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील आणि त्वचेवर काळेपणा कमी होण्यास मदत होईल.






