गव्हाच्या पिठाचा फेसपॅक बनवण्याची सोपी कृती
लग्नसराई, सणसमारंभ इत्यादी कार्यक्रमांच्या आधी महिला सुंदर दिसण्यासाठी आणि त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट, फेशिअल, क्लीनअप इत्यादी अनेक गोष्टी करतात. यामुळे त्वचेवर ग्लो येतो आणि त्वचा सुंदर दिसते. पण अनेकदा घराच्या कार्यक्रमांच्या वेळी महिलांना पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही घरगुती उपाय करून त्वचेवर नैसर्गिक ग्लो मिळवू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर काळे डाग येणं, त्वचा रखरखीत होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला महागड्या ट्रीटमेंट करतात. मात्र त्याचा फारसा परिणाम त्वचेवर दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – iStock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचेची काळजी घेण्यासाठी चेहऱ्याला वरून वेगवेगळ्या क्रीम्स लावण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करावा. आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करून त्वचेवर चमक वाढवावी. आज आम्ही तुम्हाला त्वचेवरील ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर करून फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
गव्हाच्या पिठाचा फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यात कच्च दूध घालून पेस्ट तयार करून घ्या. कच्च्या दुधाचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे त्वचेवरील काळे डाग निघून जाण्यास मदत होते. याशिवाय त्वचा अधिक उजळदार आणि सुंदर दिसते. याशिवाय चेहऱ्यावरील ओपन पोअर्स कमी होण्यास मदत होते.कच्च्या दुधात असलेले गुणधर्म त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहेत. तुम्ही कच्चे दूध नुसतेच सुद्धा त्वचेवर लावू शकता.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
तयार केलेल्या पेस्टमध्ये कच्चा दूध टाकल्यानंतर त्यात गुलाब पाणी आणि ग्लिसरीन टाकून सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेल्या फेसपॅक त्वचेवर व्यवस्थित लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवरील घाण स्वच्छ होऊन डेड स्किन निघून जाण्यास मदत होईल. त्यानंतर त्वचेवर लावलेला फेसपॅक ८ मिनिटं ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचा स्वच्छ आणि सुंदर दिसेल. हा उपाय नियमित केल्यास त्वचेवरील टॅनिंग, डेडस्किन निघून जाईल.