डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने करा केशरचा वापर
सर्वच महिलांना सुंदर आणि निरोगी त्वचा हवी असते. मात्र वाढत्या वयानुसार शरीरात अनेक बदल होऊ लागतात. याशिवाय अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ येऊ लागतात. डोळ्यांखाली आलेले डार्क सर्कल्स घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. डोळ्यांखाली आलेल्या डार्क सर्कल्सकडे योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे ते आणखीन गडद होऊन डोळ्यांखालची त्वचा पूर्णपणे काळी पडून जाते. डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीम, महागडे प्रॉडक्ट इत्यादी अनेक गोष्टी वापरल्या जातात. मात्र तरीसुद्धा डोळ्यांखाली आलेले काळे डाग निघून जात नाहीत.(फोटो सौजन्य – iStock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी महिला,मुली मेकअप करतात. मात्र अनेकदा मेकअप करूनही डोळ्यांखाली आलेले डार्क सर्कल्स दिसून येतात. मेकअप करताना वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे डोळ्यांखाली काळी झालेली त्वचा आणखीनच काळी आणि निस्तेज दिसू लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डोळ्यांखाली आलेले डार्क सर्कल्स घालवण्यासाठी केशरचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. आजीबाईच्या बटव्यातील आयुर्वेदिक उपाय त्वचेसाठी केल्यास त्वचा अधिक सुंदर आणि उठावदार दिसेल.
त्वचा आणि केसांसंबधित सस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बदाम तेलाचा वापर केला जातो. बदामाच्या तेलात विटामिन इ मोठ्या प्रमाणावर आढळून येते. डोळ्यांखाली आलेले काळे डाग घालवण्यासाठी वाटीमध्ये बदाम तेल घेऊन त्यात केशर काहीवेळ भिजत ठेवा. त्यानंतर केशर तेलात मिक्स झाल्यानंतर डोळ्यांखाली आलेल्या डार्क सर्कल्सवर लावा. हा उपाय नियमित केल्यास डोळ्यांखाली आलेले काळे डाग निघून जातील आणि त्वचा स्वच्छ होईल. बदाम तेलात केशर मिक्स केल्यानंतर तेल लावून हाताने मसाज करून घ्या. हलक्या हाताने मसाज केल्यास त्वचेला कोणतीही हानी होणार नाही.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफड जेलचा वापर केला जात आहे. कोरफड जेलमध्ये असलेले गुणधर्म त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहेत. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. यासाठी कोरफड जेलमध्ये केशरच्या काड्या टाकून २ तास तसेच ठेवून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण डोळ्यांच्या खाली लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार होईल. हा उपाय नियमित केल्यास डोळ्यांखाली आलेले काळे डाग निघून जाऊन त्वचा स्वच्छ होईल.