चिकन, मटण खाण्याऐवजी दैनंदिन आहारात करा 'या' प्रोटीनयुक्त डाळीचे सेवन
दैनंदिन आहारात शरीराला पचन होईल अशा पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. मात्र आहारात पोषक तत्वांची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. शरीरात प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यानंतर चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. अनेक लोक शरीरातील प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आहारात सतत चिकन किंवा मटणचे सेवन करतात. मात्र शाहाकारी लोकांनी दैनंदिन आहारात मुगाच्या डाळीचे सेवन करावे. मुगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि प्रोटीन आढळून येतात. मुगाची डाळ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. शरीरात होणाऱ्या सतत होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी आहारात मुगाच्या डाळीचे सेवन करावे. यामुळे शरीरात निर्माण झालेली प्रोटीनची कमतरता भरून निघते.(फोटो सौजन्य – iStock)
मेंदूची ताकद वाढवण्यासाठी नियमित करा ‘हे’ व्यायाम प्रकार! शरीरासह मन राहील कायम आनंदी आणि फ्रेश
मुगाच्या डाळीमध्ये जीवनसत्त्वे, मिनरल्स आणि फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय या डाळीचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. मुगाची डाळ महिलांच्या आरोग्यसाठी पौष्टिक आहे. मुगाची डाळ सहज पचते, त्यामुळे दैनंदिन आहारात तुम्ही मुगाच्या डाळीचे नियमित सेवन करू शकता. आज आम्ही तुम्हाला मुगाच्या डाळीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला कोणते फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
मुगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आढळून येतात. त्यामुळे शाहाकारी लोक प्रोटीन वाढवण्यासाठी मुगाच्या डाळीचे सेवन करू शकतात. मुगाच्या डाळीचे सेवन केल्यामुळे महिलांच्या शरीरातील स्नायू बळकट आणि मजबूत राहतात. याशिवाय यामध्ये अमिनो आम्ल आढळून येते. मुगाच्या डाळीचे सेवन केल्यामुळे शरीरातील थकवा कमी होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते.
चिकन, मटण खाण्याऐवजी दैनंदिन आहारात करा ‘या’ प्रोटीनयुक्त डाळीचे सेवन
मुगाच्या डाळीचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात इतर डाळीचे सेवन करण्याऐवजी मुगाच्या डाळीचे सेवन करावे. मुगाची डाळ पचनासाठी अतिशय हलकी आहे. यामध्ये आढळून येणारे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स पचनक्रिया मजबूत ठेवतात. मुगाच्या डाळीच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते.
दंड-मांडीचे स्नायू थरथरतात? सतत डोळा फडफडतो? जाणून घ्या यामागे नेमकी काय आहेत कारणं
वाढलेले वजन कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात इतर कोणत्याही पदार्थांचे सेवन करण्याऐवजी मुगाच्या डाळीचे सेवन करावे. मुगाच्या डाळीमध्ये असलेले फायबर शरीरातील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी मदत करतात. याशिवाय पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करून पोट स्लिम होते. त्यामुळे आहारात तुम्ही मुगाच्या डाळीचे सूप, मुगाच्या डाळीची खिचडी किंवा इतर पदार्थ बनवून खाऊ शकता.