रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी नियमित खा लसूण चटणी
शरीरासाठी उच्च कोलेस्ट्रॉल अतिशय घातक ठरते. रक्तात वाढलेल्या खराब कोलेस्टरॉलमुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा हृद्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. दैनंदिन आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे रक्तात पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. रक्तात वाढलेल्या चिकट थरामुळे हृदयाच्या रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे दैनंदिन आहारात कायमच संतुलित आणि सहजपचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्ततर साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी आहारात लसूण चटणीचे सेवन का करावे? लसूण चटणी बनवण्याची कृती? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना लसूणचा वापर केला जातो. यामध्ये असलेले घटक पदार्थाची चव वाढवण्यासोबतच सुगंध सुद्धा वाढवतात. लसूणमध्ये अॅलिसिन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे शरीरात जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल नष्ट होऊन आरोग्य सुधारते. रक्तवाहिन्यांमध्ये जमा होणारा प्लेक कमी करण्यासाठी आणि रक्तप्रवाह सुधारण्यासाठी लसूण चटणी खावी. जाणून घ्या लसूण चटणी बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – istock)
सकाळच्या नाश्ता करा पौष्टिक आणि चविष्ट, यंदा घरी बनवून खा ‘पालक चिला’; अवघ्या 10 मिनिटांची रेसिपी






