(फोटो सौजन्य: istock)
आजकाल कामाचा व्याप इतका वाढला आहे की, लोकांचे आपल्या आरोग्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. पुरुष असो वा महिला प्रत्येकाला आपल्या कामात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत आहे. सध्याचे जग हे स्पर्धात्मक आहे आणि अशात स्वतःला सिद्ध करण्यासाठी सर्वजण कामात असे बुडून जातात की स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे विसरून जातात. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडत पाडत त्यांचे स्वतःचे आरोग्य मात्र खराब होत असते. अनेकदा काम घाईत करण्याच्या नादात आपण आपल्या आरोग्याचे मोठे नुकसान करत आहोत हे त्यांच्या ध्यानात येत नाही. बहुतेक ३०-४० वयोगटातील पुरुषांमध्ये हे जास्त दिसून येते. आपल्याला जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत सर्व ठीक आहे असं त्यांना वाटतं मात्र तुमची हीच चुकी तुमच्या अडचणी वाढवत असते.
चिडचिडेपणा, थकवा, अशक्तपणा, वजन वाढणे, ताणतणाव किंवा एकाग्रतेचा अभाव ही आजाराची लक्षणे असू शकतात. म्हणून, जर शरीर असे संकेत देत असेल तर सावधगिरी बाळगली पाहिजे. हे केवळ धावपळीच्या जीवनाचे लक्षण नाही तर तुमच्या जीवनशैलीत आता बदल करण्याची वेळ आली असल्याचा इशारा आहे. आपले आरोग्य निरोगी आणि तंदुरुस्त बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये काही सवयींचा समावेश करणे फार महत्त्वाचे आहे. या सवयी तुम्हाला तुमच्या उतारवयातही फिट राहण्यास मदत करतील.
योगासने
पुरुषांना वयाच्या ३० ते ४० व्या वर्षी पोहोचल्यावर त्यांना कडकपणा, स्नायूंचा ताण आणि खराब पोश्चर यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. हा त्रास नको हवा असेल तर तुम्ही रोज काही वेळ योगा करायला हवा. योगा सांध्याचे आरोग्य सुधारते आणि शरीरात लवचिकता आणते. योगा तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्याचे काम करते. तुम्ही प्राणायाम, अनुलोम विलोम, सूर्यनमस्कार यांसारखे योगाभ्यास करू शकता. यामुळे शरीरातील निद्रानाश, वेदना, जडपणाची समस्या दूर होते.
रेजिस्टेंस ट्रेनिंग
३० वर्षांनंतर मसल्स मांस कमी होऊ लागते, ज्यामुळे वेदना, मंद चयापचय, कमी ऊर्जा आणि इतर अनेक समस्या जाणवू लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही रेजिस्टेंस ट्रेनिंगची मदत घेऊ शकता. तुम्ही वजन उचलणे, रेजिस्टेंस बँड्स, बॉडी वेट, पुशअप, स्क्वॅट्स असे व्यायाम करू शकता. यामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी चांगली राहते. यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीमध्ये सुधारणा होते. तसेच यामुळे टाइप २ मधुमेह, हृदयविकाराचा झटका, नैराश्य आणि लठ्ठपणाचा यांसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.
आहारातील बदल
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी वाढत्या वयाबरोबरच आपल्या आहारात काही बदल करणे महत्त्वाचे असते. तुम्ही तुमच्या आहारात काजू, बिया, पातळ मांस, निरोगी चरबी आणि विविध फळे आणि भाज्यांचा समावेश करू शकता. या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात जे तुम्हाला अनेक आजरांशी लढण्यास मदत करतात. यांचे नियमित सेवन अनेक आजरांनाही आपल्यापासून दूर ठेवते. यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
ध्यान करा
वाढत्या वयासोबतच तुम्ही शांत ठिकाणी बसून दररोज माइंड रिफ्रेशिंग व्यायाम केले पाहिजेत. यासाठी तुम्ही ध्यानधारणेचा पर्याय देखील निवडू शकता. ध्यानामुळे कॉर्टिसोलची पातळी कमी होण्यास, जळजळ कमी होण्यास आणि भावनिक संतुलन राखण्यास मदत होते. तुम्ही काही काळासाठी आत्मचिंतन, जप किंवा प्रार्थना यासारखे काही आध्यात्मिक साधना देखील करू शकता. यामुळे तुमचे हृदय आणि मन दोन्ही मजबूत होतात.
स्मरणशक्ती वाढवणारे व्यायाम
आपण जेव्हा चाळीशीत येतो तेव्हा आपली स्मरणशक्ती, मनःस्थिती, लक्ष केंद्रित करणे, समस्या सोडवणे आणि भावनिक लवचिकता, विचार करण्याची क्षमता कमी होऊ लागते. यासाठी, तुम्ही नवीन भाषा शिकणे, वाद्य वाजवणे शिकणे किंवा कोडी सोडवणे यासारखे मानसिक खेळ खेळणे महत्वाचे आहे. ध्यान आणि इतर मानसिक व्यायाम करणे देखील खूप महत्वाचे आहे. असे हे खेळ आपलॆ स्मरणशक्ती सुधारण्याचे काम करते आणि यामुळे नैराश्य आणि चिंता बऱ्याच प्रमाणात कमी होते.
पुरुषांसाठी फिटनेस का महत्त्वाचा आहे?
व्यायामामुळे कोरोनरी हृदयरोग, स्ट्रोक, टाइप २ मधुमेह आणि कर्करोग यासारख्या मोठ्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो आणि अकाली मृत्यूचा धोका ३०% पर्यंत कमी होऊ शकतो.
पुरुषांसाठी जिम महत्वाचे आहे का?
पुरुषांसाठी, स्नायूंची ताकद राखणे विशेषतः महत्वाचे आहे कारण वयानुसार ती कमी होत जाते. नियमित व्यायाम कॅलरीज बर्न करून आणि चयापचय दर सुधारून वजन व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.