डोळ्यांना काजळ लावताना फॉलो करा 'या' सोप्या टिप्स:
सर्वच महिला डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नियमित काजळ लावतात. काजळ लावल्यामुळे डोळे अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे काजळ उपलब्ध आहेत. काजळ लावल्यानंतर डोळ्यांचे सौंदर्यत आणखीनच भर पडते. आय शॅडो, आय लायनर, काजळ इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. आपल्यातील अनेक लोक नियमित काजळ लावतात, तर काहींना कधीतरी काजळ लावण्याची सवय असते. सणसमारंभाच्या दिवसांमध्ये किंवा ऑफिसला जाताना महिला काजळ लावून जातात. मात्र अनेकदा काजळ लावताना डोळ्यांमधून पाणी येऊ लागते, याशिवाय डोळे लाल होणे किंवा डोळ्यांमध्ये काजळ जाणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
त्वचेवरील टॅनिंग, काळे डाग घालवण्यासाठी नारळाच्या तेलातर मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल देखणी
हल्लीच्या काळात महिला फॅशन म्हणून डोळ्यांना काजळ लावतात. मात्र डोळ्यांमध्ये लावलेले काजळ स्प्रेड झाल्यानंतर काही वेळा डोळ्यांना हानी पोहचण्याची शक्यता असते. डोळ्यांचे सौंदर्य खुलण्याऐवजी डोळे अधिकच खराब आणि विचित्र दिसू लागतात. त्यामुळे डोळ्यांना काजळ लावताना योग्य ती काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला डोळ्यांना काजळ लावताना पाणी येऊ नये, म्हणून काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही डोळ्यांचे सौंदर्य आणखीनच खुलवू शकता.
डोळ्यांना काजळ लावण्याआधी डोळ्यांच्या खालची आणि वरची त्वचा स्वच्छ करणे आवश्यक आहे. उन्हामध्ये सतत बाहेर गेल्यानंतर किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे त्वचा सतत तेलकट होऊन जाते. तेलकट त्वचा झाल्यानंतर काही काळानंतर त्वचेमधील तेल बाहेर येण्यास सुरुवात होते. अशावेळी छेरा पाण्याने स्वच्छ धुवाने आवश्यक आहे. ज्यामुळे काजळ किंवा मेकअप स्प्रेड होणार नाही. चेहरा पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर काजळ डोळ्यांवर लावावे. अशा पद्धतीमध्ये काजळ लावल्यास ते स्प्रेड होणार नाही.
मेकअप केल्यानंतर तो सेट करण्यासाठी पावडर लावली जाते अशावेळी कोणतीही साधी पावडर न लावता कॉम्पॅक्ट पावडरचा वापर करावा. कॉम्पॅक्ट पावडर लावल्यामुळे त्वचेमधील तेल लॉक होऊन जाते, ज्यामुळे चेहरा तेलकट दिसत नाही. त्वचेवर मेकअप करताना फाऊंडेशन, बीबी क्रिम इत्यादी चांगल्या दर्जाच्या प्रॉडक्टचा वापर करावा. ज्यामुळे त्वचा उठावदार आणि सुंदर दिसते. डोळ्यांच्या कडांना कॉम्पॅक्ट पावडर लावावी, ज्यामुळे काजळ लावल्यानंतर ते सगळीकडे पसरत नाही.
सुंदर आणि हेल्दी स्किन हवी आहे? मग फॉलो करा ‘हे’ Skin Care रुटीन, त्वचा होईल चमकदार
लिपस्टिक लावल्यानंतर ती सेट होण्यासाठी जसा वेळ लागतो तसाच वेळ काजळ सेट होण्यासाठी सुद्धा लागतो. त्यामुळे काजळ लावल्यानंतर लगेच डोळे चोळू नये. कारण यामुळे काजळ सगळीकडे पसरण्याची शक्यता असते.