चौथ्या सीटवर बसल्यामुळे आरोग्यसंबंधित 'या' समस्या उद्भवतात
मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून मुंबईची लोकल ट्रेन सगळीकडे प्रसिद्ध आहे. मुंबई लोकलने दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी कामानिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणानिमित्त बाहेर जाताना प्रवास करतात. दररोजच्या धावपळीच्या जीवनात प्रवासासाठी मुंबईकर पहिली पसंती लोकल ट्रेनला देतात. कारण कमीत कमी वेळात कामाच्या ठिकणी पोहता येते. लोकलमध्ये नेहमीच गर्दी असते. गर्दीच्या वेळी लोकलमध्ये नीट उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नसते. प्रवासाच्या वेळी अनेकांना बसण्यासाठी जागा मिळते तर काहींना लांबचा प्रवास सुद्धा उभं राहून करावा लागतो. अनेकदा बसण्यासाठी चौथी सीट मिळते.
लांब जाणाऱ्या लोकांना नेहमीच चौथ्या सीटवर बसून प्रवास करावा लागतो. चौथ्या सीटच्या जागेमध्ये थोडीशी जागा मिळाल्यानंतर तिथे बसूनच लांबचा प्रवास करावा लागतो. पण या चौथ्या सीटमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. चौथी सीट मिळाल्यानंतर नीट बसण्यास जागा मिळत नाही. अशावेळी बसायला मिळाले हे फार मोठे वाटते. पण याचं चौथ्या सीटमुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला चौथ्या सीटवर बसल्यामुळे आरोग्यासंबंधित कोणत्या समस्या उद्भवतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: चेहऱ्यावर मध किती काळ ठेवावा?
नेहमीच गर्दी गोंधळातून प्रवास करावा लागतो. अशावेळी ट्रेनमध्ये बसण्यास जर चौथी सीट मिळाली तर काहीसे बरे वाटते. पण यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. नेहमी नेहमी चौथ्या सीटवर बसून प्रवास केल्यामुळे पाठ दुखणे, पाय दुखणे, कंबर दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पाठ दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर हळूहळू पाठीचा कणा आणि कंबर दुखण्यास सुरुवात होते. या समस्या उद्भवल्यानंतर उठणं, बसणं, झोपणं इत्यादी क्रिया करणं अशक्य होऊन जात.
हे देखील वाचा: बारीक आणि कमी वजनाने त्रस्त आहात? मग आहारात ‘या’ पद्धतीने करा चिया सीड्सचे सेवन, वजनात होईल वाढ
चौथ्या सीटवर बसण्यास जागा मिळाल्यानंतर थोडीच जागा बसण्यासाठी मिळते. यामुळे नीट बसता येत नाही. तसेच प्रवासादरम्यान वारंवार ट्रेनचे धक्के खाल्यामुळे बसताना आणि उठताना त्रास होण्यास सुरुवात होते. चौथ्या सीटवर बसल्यानंतर वाकून, कुबड काढून आणि खांदे झुकलेल्या पोझिशनमध्ये बसल्यामुळे सतत पाठ दुखण्यास सुरुवात होते.






