इडली खाण्याने होऊ शकतो कॅन्सर (फोटो सौजन्य - iStock)
प्लास्टिकपासून बनवलेल्या इडलींमुळे शरीरात विषारी पदार्थ वाढण्याचा धोका असतो. यामुळे पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. यामुळे हार्मोनल समस्या उद्भवू शकतात. एवढेच नाही तर कर्करोगाचा धोकादेखील असतो असा दावा आता करण्यात येत आहे. जर तुम्हालाही इडलीचे वेड असेल तर सावधगिरी बाळगा.
रिपोर्ट्सनुसार, इडलीमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. अन्न विभागाच्या तपासणीत असे आढळून आले आहे की बेंगळुरूच्या अनेक भागात आता पारंपारिक सुती कापडाऐवजी प्लास्टिकच्या चादरी इडली बनवण्यासाठी वापरल्या जात आहेत. इडली बनवताना हे प्लास्टिक उष्णतेच्या संपर्कात येते आणि विषारी रसायने सोडते, जी शरीरात पोहोचल्यानंतर हळूहळू गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते.
नक्की काय घडले?
इडली डोसा हा दक्षिण भारतीय जेवणात सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ आहे. भारतातील प्रत्येक शहरात तुम्हाला इडली डोसाची दुकाने सापडतील. तुम्हीही इडली सांबार अनेकदा चाखले असेल. पण आता तुम्ही थोडा विचार करून जेवावे. कारण इडलीमुळे कर्करोगदेखील होऊ शकतो. हो, कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये, अन्न सुरक्षा विभागाने इडलीच्या पिठाचे काही नमुने घेतले, ज्यामध्ये एक धक्कादायक खुलासा झाला. ईडीटीमध्ये कर्करोगजन्य रसायने आढळून आल्याचे तपासात समोर आले आहे.
Cancer Awareness Month: केवळ पुरूषांनाच लक्ष्य करतात ‘हे’ कॅन्सर, 7 लक्षणे दिसताच डॉक्टरांना गाठाच
काय आहे तथ्य
यापैकी ३५ हून अधिक नमुने आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे तपासणीत आढळून आले. १०० हून अधिक नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. प्लास्टिकच्या वापराविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जर अहवालात अधिक धक्कादायक तथ्ये समोर आली तर भविष्यात इडली बनवण्याचे नियमही बदलू शकतात.
या तपासणीत असेही आढळून आले की काही दुकानदार आणि हॉटेल्स इडली बनवण्यासाठी निकृष्ट दर्जाचे तांदूळ आणि उडीद डाळ वापरत आहेत. इडली अधिक पांढरी आणि आकर्षक दिसावी म्हणून त्यात ब्लीचिंग पावडर, सिंथेटिक रंग आणि रसायने मिसळली जात आहेत, जी अन्नपदार्थांमध्ये नसावीत. हे हानिकारक घटक शरीरात पोहोचू शकतात आणि आरोग्याला गंभीर धोका निर्माण करू शकतात.
काय सांगतात तज्ज्ञ
प्लास्टिकपासून बनवलेल्या या चुकीच्या इडलींमुळे शरीरामध्ये विषारी पदार्थ वाढण्याचा धोका अधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे आणि इतकंच नाही तर यामुळे पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. यामुळे हार्मोनल समस्यादेखील उद्भवू शकतात. एवढेच नाही तर कर्करोगाचा धोकादेखील असतो असे सांगण्यात आले आहे.
इडली बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमध्ये बिस्फेनॉल ए (बीपीए) सारखी रसायने असतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्याचप्रमाणे, जर प्लास्टिकमध्ये थॅलेट्स असतील तर ते अधिक धोकादायक असते. ही रसायने कर्करोगजन्य आहेत. या रसायनांच्या संपर्कात आल्याने कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो. इडली प्लास्टिकमध्ये ठेवल्यास हा धोका आणखी वाढतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.