मुरुमांपासून होईल कायमची सुटका! 'या' पद्धतीने करा कडुलिंबाच्या पानांचा वापर
वर्षाच्या बाराही महिने सर्वच महिलांसह पुरुषांनासुद्धा त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवतात.चेहऱ्यावर सतत येणारे पिंपल्स, काळे डाग, वांग किंवा इतरही अनेक समस्या उद्भवू लागतात. यामुळे त्वचेची गुणवत्ता अतिशय खराब होऊन जाते. त्वचेवर वाढलेला पिंपळ त्वचा निस्तेज करून टाकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र यामुळे त्वचेचा आणखीनच खराब होऊन जाते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. चुकीचा आहार, सतत बदलेले स्किन केअर, अपुरी झोप, कामाचा वाढलेला तणाव इत्यादी अनेक कारणांमुळे त्वचेवर पिंपल्स येण्याची जास्त शक्यता असते. त्वचेवर आलेले पिंपल्स बराच काळ चेहऱ्यावर तसेच राहतात.(फोटो सौजन्य – istock)
सैलसर ब्रा मुळे त्रस्त…हंसाजींनी दिल्या नैसर्गिक टिप्स; Breast Size होईल परफेक्ट
त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेची काळजी घ्यावी. सुंदर त्वचेसाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करावा. आयुर्वेदामध्ये कडुलिंबाच्या पानांना विशेष महत्व आहे. यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि स्वच्छ होतात. चेहऱ्यावर वाढलेल्या पिंपल्समुळे त्वचेवर खाज येऊ लागते. यामुळे चेहऱ्यावर रॅश येणे किंवा इतरही समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेची काळजी घेण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे तुमची त्वचा आतून स्वच्छ होईल.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेवर घाम तसाच साचून राहतो. यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण तशीच राहते. ही घाण स्वच्छ करण्यासाठी अनेक महिला क्लीनअप किंवा फेशिअल करून घेतात. मात्र यामुळे काहीकाळच त्वचा सुंदर दिसते. त्वचेवर जमा झालेल्या बॅक्टरीयामुळे चेहऱ्यावर सतत मुरूम आणि पिंपल्स वाढू लागतात. बऱ्याच महिला त्वचेची योग्य काळजी घेत नाहीत. त्वचेचे संतुलन कायम राखण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा.
कडुलिंबाची पाने त्वचा आणि केसांसाठी अतिशय प्रभावी ठरतात. यासाठी टोपात पाणी गरम करून घ्या. त्यानंतर त्यात कडुलिंबाची पाने टाकून उकळवा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी थंड होण्यासाठी ठेवा. पाणी थंड झाल्यानंतर गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. हा स्प्रे नियमित पिंपल्स आलेल्या स्किनवर मारल्यास आठवडाभरात फरक दिसून येईल. याशिवाय कडुलिंबाच्या पानांची वाफ घेतल्यास त्वचेवर पिंपल्स कमी होतील. कडुलिंबाची पाने सुकवून बारीक पावडर तयार करा. ही पावडर मुलतानी माती आणि गुलाब पाण्यात मिक्स करून लावल्यास त्वचा काही दिवसांमध्ये स्वच्छ आणि चमकदार दिसू लागेल.
त्वचेच्या असंख्य समस्यांपासून आराम मिळवून देईल तांदूळ तुरटीचा फेसमास्क, त्वचा आतून राहील हायड्रेट
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अंगावर सतत खाज येते. या खाजीमुळे त्वचेवर रॅश येणे किंवा त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. अशावेळी तुम्ही अंघोळीचे पाणी गरम करताना त्यात कडुलिंबाची पाने टाकून गरम करा. तयार केलेले पाणी अंघोळीसाठी वापरावे. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते. तसेच केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करावा.