व्हेकेशनहून किती वेगळा आहे स्टेकशन?
स्टेकेशन काय आहे?
स्टेकेशन म्हणजे तुम्ही तुमच्या शहरात किंवा घरापासून जवळ राहून सुट्टीचा आनंद घेता. यात मोठा प्रवास नसतो. तुम्ही फक्त जवळच्या एका हाॅटेल किंवा रिसाॅर्टला भेट देता, तिथे काही दिवस राहता आणि आपल्या लहान ट्रीपचा आनंद लुटता. रोजच्या जीवनातील थोडा वेळ बाजूला काढून मनाला पुन्हा रिसेट करायचे असल्यास अनेकजण स्टेकेशनचा पर्याय निवडतात.
स्टेकेशनची प्रमुख वैशिष्ट्ये
व्हेकेशन म्हणजे शहर किंवा राज्य सोडून कुठेतरी दूर फिरायला जाणं. यात तुम्ही लांबचा प्रवास करुन एका ठिकाणाला भेट देता, तिथे राहता आणि तेथील आयुष्य, खाद्यसंस्कृती, लोकप्रिय ठिकाणे अशा अनेक गोष्टींचा अनुभव घेता. ताणतणाव दूर करण्यासाठी आणि रोजच्या आयुष्यापासून दूर कुठेतरी चांगला वेळ घालवण्यासाठी तसेच एका संस्मरणीय आठवणीसाठी व्हेकेशन एक चांगला पर्याय ठरते. यात तुम्ही कुटुंबासोबत लाॅंग ट्रीप प्लॅन करता.
व्हेकेशनची खास वैशिष्ट्ये
दोघांपैकी कशाची निवड करावी?
स्टेकेशन – तुमचे बजेट कमी असेल आणि कीही दिवसांच्या सुट्टीत तुम्हाला मनाला मोकळं करायचं असेल, ट्रीपचा आनंद घ्यायचा असेल आणि प्रवासातील थकवा नको असेल तर स्टेकेशन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल.
व्हेकेशन – तुम्हाला तीच तीच ठिकाणे, लोक, जेवण बघून कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळा ॲडवेंचर्स अनुभव घ्यायचा असेल तर व्हेकेशन तुमच्यासाठी परफेक्ट आहे. जास्तीच्या सुट्ट्या आणि बजेट चांगल असल्यास तुम्ही व्हेकेशनचा पर्याय निवडावा.






