(फोटो सौजन्य: X)
काय दिली शिक्षा?
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही कथितरित्या इंडोनेशियातील जावा येथील एका रहिवाशासोबत घडली. चोरीच्या हेतून काही चोर दुकानात शिरले. परंतु दुकानमालक नेहमीच्या चोऱ्यांना इतका कंटाळला होता की त्याने आधीच दुकानात चोरांसाठी एक सापळा रचून ठेवला होता. अशात रात्रीच्या सुमारास चोरी करायला आलेल्या चोरांना दुकानदाराने स्थानिकांच्या मदतीने रंगेहात पकडलं. मुख्य म्हणजे त्यांनी फक्त चोराला पकडलं नाही तर त्यांना जन्माची अद्दल घडवण्याचाही निर्णय घेतला.
डक्ट टेपपासून बनवले कार्टून
स्थानिक आणि दुकानदाराने मिळून एकूण चार चोरांना रंगेहात पकडलं. चोरांनी पुन्हा असं काही करण्याचा विचार करु नये यासाठी दुकानदाराने त्यांनी शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. यानंतर चाॅकलेटी रंगाची डक्ट टेप मागवण्यात आली. स्थानिक आणि दुकानदाराने मिळून सर्व चोरांना या डक्ट टेपने पूर्णपणे बांधलं. त्यांचे डोळे आणि ओढ सोडले तर संपूर्ण शरीरावर ही डक्ट टेप लावण्यात आली होती. इजिप्तची एखादी ममी कशी दिसावी तसाच लूक सर्व चोरांना देण्यात आला होता. तथापि, चोरांना कार्टून बनवत शिक्षा दिल्यानंतर दुकानदाराने पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि मग सर्व चोरांना पोलिसांच्या स्वाधीन केले.
In Indonesia, a shop owner was fed up with nighttime thieves. He teamed up with his friends, set up an ambush, and dressed everyone they caught in Teletubby costumes. They would then hand them over to the police in this state. pic.twitter.com/rEtW6ZxsP3 — upside down site 👁️ (@UpsideSiteDown) July 2, 2026
घटनेचा व्हिडिओ @UpsideSiteDown नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सोशल मिडियावर ही घटना वेगाने व्हायरल होत असून यातील चोरांना दिलेली शिक्षा पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे. चोर कमी आणि कार्टून जास्त दिसतायेत अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्हिडिओला दिल्या. एका यूजरने म्हटले की, “ही शिक्षा पाहिल्यानंतर पुन्हा चोरी करण्याआधी दहा वेळा विचार करतील”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजवर चोर पकडलेले पाहिले होते, पण असे ‘पॅक’ केलेले पहिल्यांदाच पाहतोय”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “दुकानदाराची क्रिएटिव्हिटी भारी निघाली!”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






