जिममध्ये नवीन-नवीन जाताना विविध प्रकारच्या मशिन्स पाहून अनेकदा काय आणि कसे करावे याबद्दल गोंधळ उडतो. प्रत्येक मशीन शरीराच्या एका विशिष्ट स्नायूला टार्गेट करून व्यायामाचा जास्तीत जास्त फायदा देण्यासाठी तयार केलेली असते. योग्य मशीनची माहिती असल्यास वर्कआउट करणे सोपे होते आणि दुखापतीचा धोका टळतो. म्हणूनच चेस्ट, बॅक, लेग्स आणि कार्डिओसाठी कोणत्या मशिन्स वापराव्यात हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. या मशीन्स शिवायही डम्बेल्स, बार प्लेट्स, दोर उड्या, स्ट्रेचिंगच्या वस्तू आणि बॉडी वेट या आधारे ही खूप सर्व व्यायाम केले जातात हे लक्षात ठेवा. तर मग, आता जिममधील सर्व प्रमुख मशिन्सची नावे आणि त्यांचा वापर सोप्या भाषेत समजून घेऊयात,

छातीचे स्नायू (Chest / Pectorals) • Chest Press Machine: छातीच्या स्नायूंना टोन आणि मजबूत करण्यासाठी ही मशीन सर्वात सोपी आणि सुरक्षित मानली जाते. • Pec Deck Fly Machine (Chest Fly): ही मशीन छातीचा मध्य भाग आणि कटिंग (definition) वाढवण्यासाठी वापरली जाते. • Incline Press Machine: छातीचा वरचा भाग (Upper Chest) मजबूत आणि सुटसुटीत बनवण्यासाठी याचा वापर होतो.

पाठीचे स्नायू (Back / Lats & Rhomboids) • Lat Pulldown Machine: पाठीच्या रुंदीसाठी (V-Shape Back) ही जिममधील सर्वात महत्त्वाची मशीन आहे. • Seated Cable Row Machine: पाठीची जाडी (Thickness) आणि मध्य भाग मजबूत करण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो. • Hyperextension Bench / Machine: पाठीचा खालील भाग (Lower Back) मजबूत करण्यासाठी ही मशीन अतिशय फायदेशीर आहे.

खांद्याचे स्नायू (Shoulders / Deltoids) • Shoulder Press Machine: खांद्याचे स्नायू मोठे आणि मजबूत करण्यासाठी ही मशीन वापरली जाते. • Lateral Raise Machine: खांद्याची बाजूची गोलाई (Side Delts) वाढवण्यासाठी ही मशीन अतिशय प्रभावी आहे. • Reverse Pec Deck Machine: खांद्याचा मागील भाग (Rear Delts) मजबूत करण्यासाठी या मशीनचा उपयोग होतो.

बायसेप्स (Biceps) • Preacher Curl Machine: बायसेप्सच्या स्नायूंना योग्य आकार (Peak) देण्यासाठी ही सर्वोत्तम मशीन आहे. • Cable Bicep Curl (Cable Crossover): केबलच्या सहाय्याने सलग ताण ठेवून बायसेप्सचे स्नायू कटिंगदार बनवले जातात. • Dual Adjustable Pulley (DAP): विविध अँगलने बायसेप्स वर्कआउट करण्यासाठी या मल्टिफंक्शनल मशीनचा वापर होतो.

ट्रायसेप्स (Triceps) • Triceps Pushdown (Cable Machine): ट्रायसेप्सचे स्नायू टोन आणि मजबूत करण्यासाठी Cable Attachment सह ही मशीन वापरतात. • Triceps Dip Machine: शरीराचे वजन न वापरता ट्रायसेप्सवर थेट भार टाकण्यासाठी ही मशीन सोयीस्कर ठरते. • Triceps Extension Machine: ट्रायसेप्सचा मागील मोठा स्नायू (Long Head) टार्गेट करण्यासाठी ही मशीन उपयुक्त आहे.

मांड्यांचे पुढील स्नायू (Quadriceps) • Leg Extension Machine: मांड्यांच्या पुढील स्नायूंना (Quads) टोन आणि मजबूत करण्यासाठी ही अतिशय लोकप्रिय मशीन आहे. • Leg Press Machine: पायांवर वजन उचलून मांड्यांचा आकार आणि ताकद वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. • Hack Squat Machine: पाठीला आधार देऊन सुरक्षितपणे स्क्वॅट्स मारण्यासाठी ही मशीन वापरतात.

मांड्यांचे मागील स्नायू (Hamstrings) • Lying Leg Curl Machine: पाठीवर झोपून पायांनी वजन उचलून हॅमस्ट्रिंग्सचे स्नायू मजबूत केले जातात. • Seated Leg Curl Machine: बसून पायांच्या मागील स्नायूंवर टार्गेट करण्यासाठी ही मशीन अत्यंत सोयीची आहे. • Glute-Ham Developer (GHD): मांड्यांचा मागील भाग आणि हिप्सच्या स्नायूंसाठी ही ॲडव्हान्स मशीन वापरली जाते.

पायांचे खालचे स्नायू (Calves) • Standing Calf Raise Machine: पायांच्या खालील स्नायू (Calves) उंच आणि टोन करण्यासाठी ही उभ्याने वापरायची मशीन आहे. • Seated Calf Raise Machine: बसून सोयीस्करपणे काफ्सवर ताण देण्यासाठी या मशीनचा वापर होतो. • Donkey Calf Raise Machine: काफ्सच्या स्नायूंना जास्तीत जास्त ताण देऊन मजबूत करण्यासाठी ही मशीन वापरली जाते.

हिप्सचे स्नायू (Glutes) • Hip Abductor Machine: मांड्या बाहेरच्या बाजूला ढकलून हिप्सचे स्नायू शेपमध्ये आणण्यासाठी ही मशीन वापरतात. • Glute Kickback Machine: मागे पाय ढकलून हिप्सचे स्नायू मजबूत आणि टोन करण्यासाठी ही मशीन उपयुक्त आहे. • Hip Thrust Machine: हिप्सची ताकद आणि शेप वाढवण्यासाठी सध्या ही मशीन जिममध्ये खूप लोकप्रिय आहे.

पोटाचे स्नायू (Abs / Core) • Abdominal Crunch Machine: पोटावर दाब देऊन ॲब्सचे (Six-Pack) स्नायू बनवण्यासाठी ही मशीन वापरतात. • Captain’s Chair (Leg Raise Machine): टांगून राहून पाय वर उचलून पोटाचा खालच्या भागातील चरबी कमी करण्यासाठी ही मशीन वापरतात. • Rotary Torso Machine: पोटाच्या बाजूचे स्नायू (Obliques) टोन करण्यासाठी आणि कंबर बारीक करण्यासाठी याचा वापर होतो.

कार्डिओ मशिन्स (Cardio Machines - Fat Loss & Stamina) • Treadmill: वजन कमी करण्यासाठी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी चालणे किंवा धावणे या मशीनवर केले जाते. • Elliptical Cross Trainer: सांध्यांवर (Joints) ताण न पडता संपूर्ण शरीराचा कॅलरी बर्न व्यायाम करण्यासाठी ही मशीन सर्वोत्तम आहे. • Stationary Exercise Bike: सायकलिंग करून हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पायांची चरबी कमी करण्यासाठी ही मशीन वापरली जाते.






