कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबाची प्रकृती बिघडली; चिमुकल्याचा मृत्यू, ५ जणांवर उपचार सुरू
काय घडलं नेमक?
हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अजय श्रीवास असे आहे. अजय श्रीवास एका फायनान्स कंपनीत एजंट म्हणून कार्यरत होते आणि सोबतच प्रॉपर्टी चे बिलिंग चे काम आहे ते करायचे. कौटुंबिक वादामुळे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून त्यांची पत्नी वेगळी राहत होती. तेव्हापासून ते आपल्या आई सोबत घरात राहत होते. मात्र पंधरा दिवसांपूर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले होते त्यानंतर ते एकटेच राहत होते.
घटनेच्या दिवशी दुपारी अजय यांनी आपल्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण केले आणि नंतर ते आपल्या प्रॉपर्टी डीलिंगच्या कार्यालयात गेले. तिथून परतल्यानंतर ते आपल्या फ्लॅटमध्ये आराम करत होते. त्या दरम्यान एक व्यक्ती त्यांच्या फ्लॅटमध्ये घुसली आणि चाकूने सपासपवार करत त्यांची हत्या केली. त्यानंतर तिथून अज्ञात आरोपी फरार झाला.
घडलेल्या घटनेच्या काही वेळानंतर जेव्हा अजय यांचा एक नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी फ्लॅटवर पोहोचला तेव्हा त्यांना अजयचा मृतदेह आढळून आला. जमिनीवर अजय यांचा रक्ताने माखलेला मृतदेह पडलेला पाहून नातेवाईकांनी आरडाओरडा केला. आरडाओरडाचा आवाज ऐकून आजूबाजूची शेजारी जमा झाले आणि तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासत आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
Mumbai Crime: गर्लफ्रेंडच्या वाढदिवसासाठी मुलानेच आईचे लाखोंचे दागिने चोरले; मुंबईत खळबळ
Ans: अजय श्रीवास हे फायनान्स कंपनीचे एजंट आणि प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणारे व्यक्ती होते.
Ans: ही घटना नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेमिनरी हिल्स परिसरात घडली.
Ans: प्रॉपर्टी वाद किंवा जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.






