फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Google AI Course : जर तुम्हाला आर्टिफिशिअल इंटिलिजन्स (AI) शिकण्याची आवड असेल, पण कोडिंग किंवा टेक्निकल बॅकग्राउंड नसल्याने तुम्ही मागे हटत असाल, तर आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. गुगलने ‘कोर्सेरा’ (Coursera) प्लॅटफॉर्मवर आपला नवीन ‘एआय प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स’ लाँच केला आहे. हा कोर्स शिकू इच्छिणाऱ्या नवशिख्यांसाठी बनवण्यात आला आहे. या कोर्समध्ये तुम्ही बेसिक गोष्टीपासून ते ॲडव्हान्सड स्किल्स शिकू शकता. आजकाल कंपन्या अशा उमेद्वारांच्या शोधात आहेत. ज्यांना एआय टूल्स आणि जनरेटिव्ह एआयचा (Generative AI) योग्य प्रकारे वापर करता येतो. हीच गरज ओळखून गुगलने हा कोर्स तयार केला आहे.
हा कोर्स गुगलच्या एक्सपर्स्ट्सनी तयार केला आहे. यासाठी कोणत्याही पूर्व अनुभवाची किंवा तांत्रिक ज्ञानाची गरज नाही. विशेष म्हणचे हा कोर्स एआय केवळ एक टूल म्हणून नाही तर एक प्रोफेशनल पार्टनर म्हणून कसे वापरावे, हे शिकवतो.
या कोर्समध्ये व्हाइब कोडिंग (Vibe Coding) सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. याद्वारे तुम्ही कोडिंग न शिकताही स्वत:चे ‘कस्टम ॲप’ (Custom App) तयार करू शकता. या कोर्सद्वारे आपल्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी लोक एआय ॲप्लिकेशन तयार करू शकतात, असा दावा गुगलने केला आहे. याशिवाय यामध्ये डेटा अनॅलिसिस, कम्युनिकेशन, रिसर्च आणि बिझनेस प्रेझेंटेशन यांसारख्या जॉबसाठी आवश्यक असणारी कौशल्ये शिकवण्यावर भर दिला आहे.
गुगल एआय प्रोफेशनल सर्टिफिकेट अंतर्गत एकूण ७ कोर्सची मालिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातील प्रत्येक कोर्स पूर्ण करण्यासाठी साधारण १ ते ३ तासांचा वेळ लागतो.
हा कोर्स इंग्रजीव्यतिरिक्त इतर १६ भाषांमध्ये उपलब्ध असल्याने विद्यार्थी आपल्या सोयीनुसार भाषा बदलून शिकू शकतात. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर युजर्सना एक डिजिटल ‘प्रोफेशनल सर्टिफिकेट’ मिळते. त्यामुळे आजच्या एआयच्या जगात विद्यार्थी, फ्रिलांसर्स आणि नोकरदार प्रोफेशनल्ससाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे.






