हापूस आंब्यांसोबत चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन!
कोकणात प्रसिद्ध असलेला हापूस आंबा लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतो. फळांचा राजा म्हणून आंब्याची सगळीकडे वेगळीच ओळख आहे. पिकलेल्या रसाळ हापूस आंब्याचे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. आंब्याची चव, रंग, सुगंध अतिशय सुंदर आहे. पिकलेल्या हापूस आंब्यांपासून आमरस, आंब्याची साठ, आंब्याची वडी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र बऱ्याचदा आंब्यासोबत चुकूंच्या पदार्थांचे सेवन केले जाते. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचते. पचनसंबंधित समस्या, त्वचेवरील इन्फेक्शन इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आंब्यासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये विष तयार होऊन आरोग्याला इजा होईल.(फोटो सौजन्य – iStock)
नियमित योगा करताना चुकूनही करू नका ‘या’ चुका, संपूर्ण शरीरावर दिसून येतील गंभीर परिणाम
हापूस आंबा आणि दूध एकत्र सेवन केल्यास शरीराला हानी पोहचते. कारण दूध पचनास अतिशय जड आहे. याशिवाय हे दोन्ही पदार्थ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे आंबा आणि दुधाचे एकत्र सेवन करू नये. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे अपचन, गॅस, बद्धकोष्ठता, उलट्या आणि अंगावर रॅश उठू शकतात. हापूस आंबा जास्त पिकल्यानंतर त्याची चव खूप जास्त गोड लागते, त्यामुळे दूध आणि आंबा एकत्र खाऊ नये.
पिकलेल्या आंब्यासोबत तेलकट किंवा तेलात तळलेले पदार्थ खाऊ नये. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, गॅस, ऍसिडिटी किंवा पित्ताचा त्रास होऊ लागतो. वारंवार पित्ताचा त्रास होण्यास सुरुवात झाल्यनंतर शरीरात थकवा, अशक्तपणा वाढू शकतो. त्यामुळे हापूस आंबा खाल्यानंतर २ किंवा ३ तासांनी तळलेल्या किंवा तुम्हाला हवे असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
रोजच्या जेवणात सगळ्यांचं मसालेदार, तिखट आणि तेलकट पदार्थ खाण्याची सवय असते. तेलकट तिखट पदार्थांचे सेवन केल्यानंतर आंब्याचे सेवन करू नये. आंब्याचे सेवन आणि मसालेदार पदार्थ एकत्र खाण्यास पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय शरीरावर लाल डाग, त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता वाढू शकते.
उन्हाळा वाढल्यानंतर थंड पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते. मात्र आंब्याचा रस किंवा आंबा खाल्यानंतर कोल्ड्रिंक्सचे सेवन करू नये. यामुळे अॅसिड रिफ्लक्स, अपचन इत्यादी समस्या उद्भवू शकतात. याशिवाय शरीरात उष्णता वाढू लागते. त्यामुळे थंड पदार्थांचे सेवन केल्यानंतर कोल्ड्रिंक किंवा इतर कोणत्याही पेयांचे सेवन करू नये.