मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत काम करत राहिल्यामुळे अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. शारीरिक आणि मानसिक तणावामुळे डोकेदुखीचा त्रास वाढू लागतो. डोकेदुखीचा त्रास सुरु झाल्यानंतर कोणतंही काम करण्याची इच्छा होत नाही. पण हीच डोकेदुखी कायम राहिल्यामुळे मायग्रेनची समस्या असू शकते. मायग्रेनचा त्रास होण्यास सुरुवात झाल्यानंतर तीव्र डोकेदुखी वाढू लागते. शिवाय अस्वस्थता, चक्कर येणे, उलट्या, मानेच्या शिरा दुखणे, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. मायग्रेनचा सुरु झाल्यानंतर एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला डोक्याच्या त्रास होऊ लागतो. तसेच हा त्रास मोठा आवाज ऐकल्यामुळे किंवा सतत स्क्रीन पाहिल्यामुळे उद्भवण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: वजन कमी करण्यासाठी टॉप 5 पेय; वेट लॉससाठी उत्तम पर्याय
सतत डोकेदुखीचा त्रास होण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा मेडिकल मधून पेन किलरच्या गोळ्या आणून खातात. मात्र सतत पेन किलर खाणे आरोग्यासाठी घातक आहे. अशावेळी तुम्ही घरगुती उपाय करूनसुद्धा मायग्रेनच्या दुखण्यावर आराम मिळवू शकता. यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होऊन आराम मिळेल. मानेच्या नसा दुखणार नाहीत. गोळ्या औषधांचे अतिसेवन आरोग्यासाठी हानीकारक आहे. चला तर जाणून घेऊया मायग्रेनचा त्रास झाल्यास कोणते घरगुती उपाय करावे.
आयुर्वेदामध्ये गायीच्या तुपाला विशेष महत्व आहे. अनेकदा डॉक्टरसुद्धा गायीचे तूप खाण्याचा सल्ला देतात. गायीच्या तुपाचे सेवन केल्यामुळे अनेक समस्यांपासून आराम मिळतो. डोकेदुखीचा त्रास होण्यास सुरुवात झाल्यानंतर नाकामध्ये गायीच्या तुपाचे दोन ते तीन थेंब टाकावे. यामुळे डोके दुखीचा त्रास थांबतो. शिवाय चांगली झोपही लागते. शरीर आमी त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी गायीचे तूप अतिशय प्रभावी आहे.
पुदिन्याची पाने अनेक आजारांवर रामबाण उपाय आहेत. पुदिन्याची पाने मायग्रेनच्या समस्येपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. पुदिन्याच्या पानांमध्ये आढळून येणारे मेन्थॉल, डोकं थंड करण्यासाठी मदत करते. डोके दुखीचा त्रास वाढल्यानंतर पुदिन्याचे तेल लावून हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळेल.
डोकेदुखीची समस्या उद्भवू लागल्यानंतर आल्याचा वापर करावा. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच तुम्ही आल्याच्या चहाचे सेवन केल्यास तुम्हाला डोकेदुखीपासून लवकर आराम मिळण्यास मदत होईल. डोकं दुखू लागल्यानंतर होणारी मळमळ आणि उलटी कमी करण्यासाठी तुम्ही आल्याच्या चहाचे सेवन करू शकता.
हे देखील वाचा: तुम्ही अनेकदा लघवी थांबून बसून राहता का? नुकसान वाचाल तर आजच सोडाल ही सवय
लिंबूमध्ये असलेले गुणधर्म त्वचा आणि आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. लिंबाच्या सालीची पेस्ट करून कपाळावर लावावी, जेणेकरून सुगंधी वासामुळे डोके दुखी थांबेल. तसेच तुम्ही रोजच्या आहारात लिंबाचा आणि लिंबाच्या सालींचा वापर करू शकता.