दातांवरील पिवळा थर काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय
पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र तरीसुद्धा पिवळे दात स्वच्छ होत नाही. दात पिवळे किंवा दातांवर पांढरा थर साचून राहण्यास सुरुवात झाल्यानंतर दात हळूहळू खराब दिसू लागतात. दातांवरील साचून राहिलेल्या पिवळ्या थरामुळे हसताना किंवा बोलताना लाजिरवण्यासारखे वाटू लागते. सुंदर हास्य आणि सुंदर दिसण्यासाठी दात स्वच्छ असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे दात पांढरे शुभ्र असणे फार गरजेचे आहे. दात स्वच्छ ठेवण्यासाठी कोलगेट किंवा मशेरी लावली जाते. पण यामुळेसुद्धा दात स्वच्छ होत नाहीत. दातांवर साचून राहिलेला पिवळा थर तसाच कायम राहतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दातांवर साचून राहिलेला पिवळा थर कायमचा घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास दातांवरील पिवळापणा कायमचा निघून जाईल आणि दात स्वच्छ होतील.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
खराब झालेले पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ऍपल सायडर व्हिनेगरचा वापर तुम्ही करु शकता. ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये असलेले गुणधर्म दात स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. यासाठी एक कप पाण्यात १ चमचा ऍपल सायडर व्हिनेगर टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर माऊथवॉश प्रमाणे या मिश्रणाचा वापर करून ३० सेकंदांनी तोंड लगेच धुवा. अन्यथा दातांचे नुकसान होऊ शकते.
दात स्वच्छ ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित ब्रश करणे आवश्यक आहे. ब्रश केल्यामुळे रात्रभर दातांमध्ये अडकून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते. शिवाय तोंडाला येणारा घाण वास निघून जातो. शिवाय दात स्वच्छ करण्यासाठी दिवसभरातून दोन वेळा ब्रश करणे आवश्यक आहे. पण घरगुती उपाय करूनसुद्धा दात स्वच्छ होत नसतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
दातांवरील पिवळा थर काढून टाकण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. कारण यामध्ये असलेले गुणधर्म दात स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. दात घासताना चिमूटभर बेकिंग सोडा ब्रशवर घेऊन ब्रश करा. यामुळे तुमचे दात स्वच्छ होण्यास मदत होईल. शिवाय टूथपेस्टमध्ये सुद्धा मिक्स करून तुम्ही बेकिंग सोडा लावू शकता. हा उपाय केल्यामुळे दात आणि हिरड्यांमधील बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होईल. बेकिंग सोड्याचा वापर केल्यामुळे दातांमध्ये पुन्हा बॅक्टेरियाची वाढ होणार नाही आणि दात स्वच्छ होऊन चमकदार दिसू लागतील.