सुनीता विल्यम्स अंतराळात शौचालयाचा वापर कशा प्रकारे करायच्या!
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर सुमारे नऊ महिने अंतराळात अडकले होते. मात्र अखेर आज पहाटे सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी भारतामध्ये पुन्हा परतले आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात आठ दिवसांसाठी सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अंतराळात गेले होते. मात्र त्यानंतर बोईंगचे स्टारलाइनर अंतराळयान त्यांना पृथ्वीवर पुन्हा परत आणणार होते. पण स्टारलाइनरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना नऊ महिने तिथेच राहावे लागले. मात्र आज पहाटे त्यांना एलोन मस्कच्या कंपनी स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरवले.
चहासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन! आतड्यांच्या होतील चिंधड्या, वाढेल पित्ताची समस्या
सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पृथ्वीवर येण्यासाठी बरीच वाट पाहावी लागली. आंतरराष्ट्रीय अंतराळआंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून ते पृथ्वीवरील परतीचा प्रवास सुमारे 17 तासांचा होता. ड्रॅगन कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना ताशी 17,000 मैल वेगाने प्रवास करत होता. त्यानंतर कॅप्सुलचा वेग मिनिटांनी कमी झाला. मात्र अखेर पहाटेच्या सुमारास सुनीता विल्यम्स पृथ्वीवर पोहचल्या. पण अंतराळात असताना अंतराळवीर शौचालयाचा वापर कशा प्रकारे करतात? असे अनेक प्रश्न तुम्हाला देखील पडले असतील ना. चला तर जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती.
काही वर्षांआधी सुनीता विल्यम्स अंतराळात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी एक व्हिडिओ तयार केला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितले होते की अंतराळात पाणी कसे पितात? शौचालय किंवा बाथरूमचा वापर कसा केला जातो? याबद्दल माहिती सांगितली होती. अंतराळातील अंतराळ स्थानकात अंतराळवीरांसाठी एक अतिशय खास शौचालय बांधण्यात आले आहे. हे शौचालय सामान्य शौचालयासारखे दिसते पण ते व्हॅक्यूम शौचालय आहे. व्हॅक्यूम टॉयलेटमध्ये, शरीरातून बाहेर पडणारा कचरा व्हॅक्यूम फोर्सच्या मदतीने हवेद्वारे टाकीमध्ये नेला जातो. अंतराळवीर उभे राहून किंवा बसून सहजपणे या शौचालयाचा वापर करू शकतात. अंतराळात तयार करण्यात आलेले व्हॅक्यूम शौचालय अंतराळवीरांसाठी अतिशय सोयीस्कर आहे.
अंतराळवीर अंतराळात लघवी करण्याची पद्धत देखील खूप वेगळी असते. लघवी करण्यासाठी व्हॅक्यूम पाईप वापरला जातो. अंतराळयानात लघवी आणि शौचास जाण्यासाठी स्वतंत्र शौचालये आहेत. याशिवाय, उपकरणात बसणवण्यात आलेल्या एका वेगळ्या टाकीमध्ये मूत्र देखील साठवले जाते. ज्याचा पुनर्वापर करून पाणी म्हणून वापरले जाते. अंतराळात अंतराळवीरांसाठी शौचालयांची व्यवस्थित करण्यात आली आहे.
किडनी आतून सडल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ भयानक लक्षणे, वेळीच सावध होऊन घ्या डॉक्टरांचा सल्ला
अंतराळवीर पिण्यासाठी पाण्याची पिशवी घेऊन जातात. तिथे पिशिवीमध्ये असलेल्या नळीच्या मदतीने पाणी प्याले जाते. सुनीता विल्यम्स हवेत तरंगत पाणी पितानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यांचे शरीर स्वच्छ करण्यासाठी, अंतराळवीर आंघोळ करत नाहीत तर त्याऐवजी ओल्या कापडाने किंवा विशेष द्रवाच्या मदतीने त्यांचे शरीर स्वच्छ करतात.