चहासोबत चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन! आतड्यांच्या होतील चिंधड्या
सकाळी उठल्यानंतर सगळ्यांना चहा किंवा कॉफी पिण्यास लागते. चहाचे सेवन केल्यास दिवसाची सुरुवात झाल्यासारखे वाटतं नाही. संध्याकाळच्या वेळी सुद्धा अनेक लोक चहा, कॉफीचे सेवन करतात. तर काहींना दिवसभरातून 4 ते 5 वेळा चहा पिण्यास लागतो. पण सतत चहाचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. सकाळी उठल्यानंतर आपल्यातील अनेकांना चहा किंवा कॉफीसोबत बिस्कीट, ब्रेड किंवा इतर पदार्थ खाण्याची सवय असते. पण या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्याला हानी पोहचू शकते. चहासोबत कोणत्याही पदार्थाचे सेवन केल्यास पचनसंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. बिघडलेल्या पचनक्रियेचा शरीरावर नकारात्मक परिणाम दिसून येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चहासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
किडनी आतून सडल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ भयानक लक्षणे, वेळीच सावध होऊन घ्या डॉक्टरांचा सल्ला
सकाळच्या नाश्त्यात चहा किंवा कॉफीसोबत ब्रेड किंवा बटरचे सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. चहा आणि ब्रेड किंवा बटर खाणे अनेकांचा आवडता नाश्ता आहे. पण बटर किंवा ब्रेडमध्ये मैद्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे पदार्थ पचनास खूप जड असतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफीसोबत ब्रेड बटर खाऊ नये. चहामधील टॅनिन आणि बटरमधील चरबी यांचा एकत्र परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. याशिवाय हे पदार्थ नियमित खाल्यामुळे पचनाची समस्या उद्भवू शकते आणि शरीराला हानी पोहचेल.
काहींना संध्याकाळच्या वेळी लिंबू टाकून बनवलेला चहा पिण्यास खूप जास्त आवडतो.पण लिंबामध्ये असलेले सायट्रिक ऍसिड आणि चहामधील टॅनिन शरीरातील आम्ल्पिताची पातळी वाढवतात आणि ज्यामुळे पचनक्रिया बिघडते. लिंबाचा चहा प्यायल्यामुळे पोटामध्ये जळजळ होणे, पचनक्रिया बिघडणे, आतड्यांसंबंधित समस्या इत्यादी समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर लिंबाचा चहाचे उपाशी पोटी सेवन करू नये.
कोरोनानंतर पुन्हा एकदा HKU1 चे थैमान, भारतामध्ये आढळून आलेल्या नव्या विषाणूमुळे वाढली चिंता
चहा सोबत चुकूनही तेलकट किंवा अतितिखट पदार्थांचे सेवन करू नये. असे केल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. तळलेल्या पदार्थांमध्ये असलेली अतिरिक्त चरबी शरीराचे वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते. सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रियेवर तणाव येतो, ज्यामुळे आरोग्य बिघडते. तेलकट पदार्थांचे सेवन सकाळच्या वेळी केल्यामुळे आरोग्यासह आतडयांनासुद्धा हानी पोहचते.