(फोटो सौजन्य: Pinterest)
जुनं ते सोनं म्हणतात ते खोटं नाही. जुन्या काळात वापरली जाणारी तांब्या-पितळेची भांडी आजही अनेक सण-समारंभ किंवा पूजेच्या विधींमध्ये आवर्जून वापरली जातात. आपल्याकडचं शास्त्रचं असतं ते… रोजच्या जीवनात अनेकांनी यांचा वापर करण बंद केले आहे, ज्यामुळे खास प्रसंगी ही भांडी बाहेर काढताच त्यावर आपल्याला साठलेला काळा थर दिसून येतो. ही भांडी नियमितपणे वापरली नाही तर ती निस्तेज दिसू लागतात. अशात त्यांना साफ करण्यासाठी आणि त्यांना चमकवण्यासाठी मिहिलांनी फार मेहनत घ्यावी लागते. तुम्हालाही तांब्या-पितळेची भांडी चमकवण्यासाठी मेहनत घ्यावी लागत असेल आणि या समस्येला तुम्ही त्रस्त झाला असाल तर आजची ही ट्रिक तुमच्या फार कामी येणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, तांब्या-पितळेची भांडी क्लिन करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत किंवा महागड्या गोष्टींची गरज लागणार नाही तर तुम्ही घरगुती पदार्थांचा वापर करुनच भांड्यांना नव्यासारखी चकाकी मिळवून देऊ शकता. यामुळे तुमची मेहनत तर वाचेल शिवाय काळ्या पडलेल्या तांब्या-पितळेच्या भांड्यांना नव्यासारखा चमकही मिळेल. चला हा कोणता उपाय आहे ते जाणून घेऊया.
फूड्स अँड फ्लेव्हर्स बाय शिल्पी नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजने फक्त एका मिनिटात पितळ, तांबे आणि कांस्य भांडी चमकवण्यासाठी एक हॅक शेअर केला आहे. दिवाळी पूजा किंवा साफसफाईनंतर जर तुमची भांडी पुन्हा काळी पडू लागली असतील, तर तुम्ही घरी हा उपाय ट्राय करुन तुम्ही तुमची जुनी भांडी नवीनसारखी चमकू शकता.
साहित्य
क्लीनिंग सोल्यूशन कसे बनवायचे
थंडीत सांध्यांमध्ये वेदना का होतात? नियमित फॉलो करा ‘या’ सवयी, अजिबात आखडणार नाहीत शरीरातील हाडे
भांडी स्वच्छ करण्याचे इतर मार्ग
तांबे, पितळ आणि कांस्य भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही आणखीन एका उपायाची मदत घेऊ शकता. यासाठी एका लिंबाचा रस एक चमचा बेकिंग सोडामध्ये पिळून घ्या आणि पूर्णपणे मिसळा. तांबे, पितळ आणि कांस्य भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या सालीने घासून घ्या. ही भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही चिंचेचा कोळ देखील वापरू शकता. यामुळे भांडा स्वच्छ होऊन नव्यासारखी चमकू लागतील.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






