फोटो सौजन्य: iStock
उन्हाळ्याचा सीजन सुरू झाला आहे. जरी हा काळ उष्णतेमुळे अनेकांना त्रासदायक वाटत असला, तरी काही जण आंब्यामुळे अनेक लोक या ऋतूची आतुरतेने वाट पाहत असतात. आंबा हा बहुतांश लोकांचा आवडता फळ आहे.
सध्या बाजारात आंब्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे या मागणीची पूर्तता करण्यासाठी अनेक ठिकाणी भेसळयुक्त आणि रासायनिक पदार्थांनी पिकवलेले आंबे विक्रीस आणले जात आहेत. असे आंबे आपल्या आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकतात.
अशा परिस्थितीत, आंबा खरेदी करताना तो नैसर्गिकरीत्या पिकवलेला आहे की केमिकलच्या सहाय्याने, हे ओळखणे फार महत्वाचे आहे. चला, आपण अशाच काही सोप्या पद्धती जाणून घेणार आहोत, ज्यांच्या मदतीने केमिकल पद्धतीने पिकवलेले आंबे तुम्ही सहज ओळखाल.
कडक उन्हाळ्यात १० मिनिटांमध्ये घरी बनवा खरबूज बियांचे मिल्कशेक! बियांचा करा ‘अशा’ पद्धतीने वापर
नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यांमध्ये गोडसर फळांचा नैसर्गिक सुगंध असतो, तर कृत्रिम पद्धतीने केमिकलच्या मदतीने पिकवलेल्या आंब्यांमध्ये थोडासा रासायनिक किंवा विचित्र वास जाणवू शकतो.
केमिकल पद्धतीने पिकवलेले आंबे पाहताना त्यावर जखमा, डाग किंवा ओरखडे दिसू शकतात. केमिकलच्या प्रभावामुळे फळांची त्वचा खराब होते. अशा आंब्यांचे सेवन टाळणे उत्तम. नैसर्गिक आंब्यांवर असे डाग सहसा आढळत नाहीत.
नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे हातात घेतल्यावर किंचित घट्ट आणि टवटवीत वाटतात, तर केमिकलने पिकवलेले आंबे अधिक मऊ वाटतात. हे केमिकल फळांच्या पेशींना कमकुवत करतात, ज्यामुळे त्यांची घनता कमी होते.
एका भांड्यात पाण्यात थोडा बेकिंग सोडा मिसळून त्यात आंबे 15 ते 20 मिनिटे भिजवा. नंतर ते धुऊन पहा, जर आंब्याचा रंग बदलत असेल, तर ते केमिकल पद्धतीने पिकवलेले किंवा पॉलिश केलेले असण्याची शक्यता आहे.
केमिकलयुक्त आंब्यांचा रंग एकसंध आणि अधिक पिवळसर किंवा नारिंगी असतो, तर नैसर्गिक आंब्यांमध्ये रंगात थोडा फरक व असमानता दिसते. केमिकलयुक्त आंबे थोडे अधिक चमकदारही वाटू शकतात.
केमिकलने पिकवलेला आंबा चवीनं थोडा फिका, आंबटसर किंवा कृत्रिम चव घेऊन येतो. तर नैसर्गिक आंबा गोडसर, रसाळ आणि ताजेपणाची जाणीव करून देतो.
एक बादली पाण्यात आंबे टाका. नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे पाण्यात बुडतात, तर रासायनिक प्रक्रियेतून गेलेले आंबे पाण्यावर तरंगू शकतात.
या सोप्या चाचण्या करून तुम्ही आरोग्यदायक आणि नैसर्गिक आंब्यांची निवड सहज करू शकता.