युरिक अॅसिडवरील घरगुती उपाय आहेत या बिया (फोटो सौजन्य - iStock)
आजकाल युरिक अॅसिडचे प्रमाण वाढण्याची समस्या सामान्य होत चालली आहे. शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने गाउट, सांधेदुखी, सूज आणि किडनीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. शरीरात काही प्रमाणात युरिक अॅसिड असते, परंतु त्याची वाढ धोकादायक ठरू शकते.
युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी, आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. काही बिया आहेत ज्या युरिक अॅसिड नियंत्रित करण्यास मदत करतात. या ५ बियांबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार आपण याबाबत जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया ठरतील उत्तम
भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, जस्त आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. या बिया युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यास मदत करतात.
काय आहेत फायदे
कसे खावे?
भोपळ्याच्या भाजलेल्या बिया नाश्ता म्हणून खाऊ शकतात किंवा सॅलड आणि स्मूदीमध्ये घालता येतात. तसंच तुम्ही नियमित याचा नाश्त्यामध्ये समावेश करून घेऊ शकता.
शरीरामध्ये वाढतोय युरिक अॅसिड; ‘या’ गोष्टींपासून ठेवा अंतर, त्रास होईल छू मंतर
आळशीच्या बिया

आळशी खाण्याचे आरोग्यदायी फायदे
आळशी किंवा आळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि लिग्नान्स भरपूर प्रमाणात असतात, जे युरिक अॅसिड नियंत्रित करण्यास मदत करतात.
काय आहेत फायदे
कसे खावे?
तुम्ही आळशीची बारीक पावडर करून दही, सॅलड किंवा स्मूदीमध्ये मिसळून खाऊ शकता. याशिवाय काही भाज्यांमध्येदेखील तुम्ही आळशीचा वापर करून घेऊ शकता
सूर्यफुलाचे बी

सूर्यफूल बी करेल कमाल
सूर्यफुलाच्या बिया व्हिटॅमिन ई, सेलेनियम आणि निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहेत. हे शरीरातील युरिक अॅसिडचे उत्पादन नियंत्रित करतात आणि मूत्रपिंडांना विषमुक्त करण्यास मदत करतात.
कसे खावे?
चिया सीड्स

चिया सीड्सचे फायदे
चिया बिया प्रथिने, फायबर आणि ओमेगा-३ चा चांगला स्रोत आहेत, जे युरिक अॅसिड नियंत्रित करण्यास मदत करतात.
चिया सीड्सचे फायदे
कसे खावे?
चिया बिया पाण्यात भिजवून जेल बनवा आणि ते स्मूदी, दही किंवा ओटमीलमध्ये मिसळून खा
युरिक अॅसिड त्वरीत काढेल शरीराबाहेर, 5 आयुर्वेदिक उपाय कराच
तीळ
तीळांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे युरिक अॅसिड नियंत्रित करण्यास मदत करतात.
तिळाचे फायदे

तिळाचा करून घ्या उपयोग
कसे खावे?
तुम्ही तीळ भाजून लाडू बनवू शकता किंवा सॅलड आणि भाज्यांमध्ये मिक्स करून खाऊ शकता
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






