विटामिन डी ची कमतरता भरून काढेल ही शाकाहारी भाजी (फोटो सौजन्य - iStock)
बरेच लोक मांसाहारी असतात आणि इतकंच नाही तर त्यांचं असं म्हणणं असतं की चिकन आणि मटणाच्या चवीसमोर सर्व काही अपयशी ठरते. काही वेळा लोक ‘तुम्ही शाकाहारी कसं खाता?’ असाही प्रश्न विचारायला कमी करत नाहीत. पण चिकन मटणापेक्षाही एक शाकाहारी भाजी जास्त चव देते. शिजवल्यानंतर ही भाजी अगदी मांसाहारासारखीच दिसते आणि या कमालीच्या भाजीचे शरीरालाही अनेक फायदे मिळतात.
आम्ही मशरूमबद्दल बोलत आहोत, जे काही लोक खाणे टाळतात. त्यांना वाटते की मशरूम हे मांसाहारी अन्न आहे. पण मशरूमची भाजी ही पूर्णपणे शाकाहारी आहे. शाकाहारी लोकांनी मशरूम खावेच, कारण ते व्हिटॅमिन डी ची कमतरता टाळते. चला जाणून घेऊया मशरूम खाण्याचे फायदे (फोटो सौजन्य – iStock)
हाडे मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. स्नायूंना काम करण्यासाठीदेखील विटामिन डी ची आवश्यकता भासते. विटामिन डी हे सहसा मांसाहारी अन्नात आढळते, परंतु अनेक मशरूम ‘यूव्ही ट्रीटमेंट’ करून विकले जातात. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, त्याचे एर्गोस्टेरॉल अतिनील किरणांच्या संपर्कात आल्यावर व्हिटॅमिन डी बनते.
ज्यांना त्यांच्या मेंदूच्या कार्यात समस्या दिसते त्यांनी नियमित मशरूमचे सेवन केले पाहिजे. अनेक वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आले आहे की मशरूममधील पॉलीफेनॉल आणि अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात, जे अल्झायमर आणि पार्किन्सनचे मुख्य कारण आहे असं मानले जाते.
मशरूम हे अन्न तुमचे वजन कमी करण्यास मदत करू शकते. काही शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीच्या सवयींसह मशरूम खाल्ल्याने वजन राखण्यास मदत होते. लठ्ठपणा टाळण्यास ते खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्ही आठवड्यातून साधारण २-३ वेळा मशरूम नक्कीच खाऊ शकता. मशरूम प्रमाणात खाल्ल्यास तुमचे वजन कमी करण्यास मदत मिळते.
शरीरात सतत थकवा जाणवतो? विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
रक्तदाब वाढणे हृदयासाठी धोकादायक आहे. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. परंतु तुम्ही मशरूम खाऊन ते कमी करू शकता, त्यात पोटॅशियम भरपूर असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी महत्वाचे आहे. रक्तदाबाचा प्रत्यक्ष परिणाम हा हृदयावर होतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी आपल्या आहारात मशरूमचा वापर करून घ्यावा.
आतड्याचे आरोग्य त्याच्या बॅक्टेरियावर अवलंबून असते. मशरूम खाल्ल्याने हे निरोगी बॅक्टेरिया वाढू शकतात. यामुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रिफ्लक्स रोग इत्यादींचा धोका कमी होतो. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते. आतड्यांमध्ये त्रास होत असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही आहारात मशरूम खावे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.